Helping Hand Group Initiative: विकास हायस्कूलचे मा

वृक्ष म्हणजे जीवनाचा संदेश; विकास हायस्कूल बॅच-2000 हेल्पिंग हँड ग्रुपचा प्रेरणादायी उपक्रम

Helping Hand Group Initiative

श्रीराम सरोवर परिसरात ५० हून अधिक वृक्षांचे रोपण

पर्यावरण संवर्धनासह धार्मिक स्थळाच्या सौंदर्य वृद्धीचा संकल्प

कन्हान (Helping Hand Group Initiative) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत समाजा प्रती आपली बांधिलकी जपणाऱ्या विकास हायस्कूल (बॅच -२०००) हेल्पिंग हँड ग्रुपतर्फे रविवारी श्रीराम सरोवर टेकडी परिसरात वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. सुमारे महिनाभराच्या नियोजना नंतर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात माजी विद्यार्थ्यांनी ५० हुन अधिक वृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

विद्यार्थी जीवनात ज्या शाळेने घडविले, त्या शाळे प्रती कृतज्ञता व्यक्त करित पुढील पिढीला पर्यावरण संवर्धनाचे संस्कार मिळावेत,  या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. वाढत्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावुन त्याचे संगो पन करावे, असा संदेशही यावेळी देण्यात आला. श्री राम सरोवर हे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वाचे स्थळ असुन येथे येणाऱ्या भाविकांना सावली, शुद्ध हवा  व हिरवळ लाभावी या हेतुने श्री राम सरोवर समितीच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करून आवश्य क परवानगी देत प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.

या (Helping Hand Group Initiative) उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉ. मोनिका मालवीये (वर्मा) यांनी कुटुंबासह उपस्थित राहुन वृक्षारोपणात सहभाग घेतला. त्यांनी प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी म्हणुन किमान एक वृक्ष लावुन त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. यावेळी श्रीराम सरोवर समितीचे नथुजी मोहाडे, अनिल नानवटकर, पंढरी बाळबुधे, मनोज लेकुरवाडे, सचिन भोयर, आकाश राजुत, सुरेंद्र लेकुरवाडे, दिलीप मोटे, अशोक वासाडे तसेच विकास हायस्कूलचे माजी विद्यार्थी डॉ. मोनिका मालवीये (वर्मा), शरद दूधपचारे, आशीष मुंगले, योगेश डुमरे, सुनिल सरोदे, विशाल पंडितकर, अमोल साकोरे, प्रविण गडे, सुशील सोनटक्के, अमोल देवढगळे, दीपक घोटे, प्रमोद सोनटक्के, पंकज लंगडे, मनिष निवाळकर, गोपाल मसार, अजय बिसने आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.           पर्यावरण संरक्षण, सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक स्थळाचे संवर्धन या तिन्ही उद्दिष्टांचा सुंदर संगम साधणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकां कडून सर्वत्र कौतुक होत आहे.