'क्रांतिकारी'च्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी चैत्राली शेलार; मराठवाडा विभाग महिला आघाडी अध्यक्षपदी पूजा चव्हाण
लातूर ( Farmers' Organization) : क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षापदी चैत्राली शेलार यांची निवड करण्यात आली. पुणे आणि मराठवाड्यात संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करताना मराठवाडा विभागीय महिला आघाडी अध्यक्षपदी पूजा चव्हाण यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांनी केली. पुण्यातील कोथरूड येथे गणेशकृपा सभागृहात झालेल्या मेळाव्यात या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यात चैत्राली शेलार महिला प्रदेशाध्यक्षा महाराष्ट्र, पूजा चव्हाण - महिला अध्यक्ष, मराठवाडा विभाग, राजेंद्र ढमाले - जिल्हा अध्यक्ष, पुणे शहर, ॲड. अनिल भिलारे - जिल्हा अध्यक्ष, पुणे विधी आघाडी, अमोल बोराडे - जिल्हा उपाध्यक्ष, पुणे शहर, दिलीप लिंबळे - शहर संघटक पुणे शहर, ज्योतिराम पावले - भूम तालुका संघटक, तर सातारा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून विशाल लोमटे यांना नियुक्त करण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य समन्वयक सचिन पांडुळे, राज्य उपाध्यक्ष जयवंत दहिभाते, डॉ. सिताराम शरणागत आणि राज्य कोअर कमिटी सदस्य राजेंद्र आबा मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, सांगली जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, धाराशिव जिल्हाध्यक्ष भास्कर वारे, लातूर युवा जिल्हाध्यक्ष प्रज्योत हुडे, सांगली युवा जिल्हाध्यक्ष मयूर गायकवाड,करमाळा तालुकाध्यक्ष अमोल घुमरे, माळशिरस तालुकाध्यक्ष शिवराम गायकवाड, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख अजित गडदे, श्रीराम चलवाड, भाऊ केदारी, शिवम राऊत, मल्हारी कांबळे, सुनील दाशाळ, भाऊसाहेब मुंडे, कांतीलाल शिंदे, गौतम कांबळे, दत्ता किणीकर, विशाल ढोबळे, दिगंबर कर्वे, मारुती कसबे, बिभीषण शिंदे, आदेश कसबे, सावन गवळी यांच्यासह राज्यातील शेकडो सक्रिय कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल उद्धव धुमाळे, सचिन वाघमारे तर कल्पना झोरे व अंजली केदारी यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमासाठी जयवंत दहिभाते, ॲड. अनिल भिलारे, ॲड. दत्तात्रय दहिभाते यांनी परिश्रम घेतले.
शेतकऱ्यांच्या घामाची आणि हक्काची लढाई
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे म्हणाले की, क्रांतिकारी शेतकरी संघटना ही केवळ एक संघटना नसून शेतकऱ्यांच्या घामाची आणि हक्काची लढाई लढणारे एक व्यासपीठ आहे. "शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळवून देणे, सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा आणि नैसर्गिक आपत्तीत बळीराजाला खंबीर पाठबळ देणे" हाच संघटनेचा मुख्य विचार आहे. नवनिर्वाचित पदाधिकारी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हाच विचार तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतील आणि अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.