Parbhani Zilla Parishad: परभणीत जिल्हा परिषदेतील ग

परभणीत जि.प.तील कार्यकारी अभियंता डी. ए. घुगे यांची बदली

Parbhani Zilla Parishad

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुख्य प्रशासकीय अधिकार्‍यांनी काढले आदेश

परभणी (Parbhani Zilla Parishad) : जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता डि.ए.घुगे यांची बुलढाणा जिल्हा परिषदेत बदली झाली आहे. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन गुरव यांच्या स्वाक्षरीने ३० जून रोजी कार्यालयीन आदेश काढण्यात आले आहे. परभणी येथील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंता म्हणून डि.ए.घुगे यांची कारकिर्द चांगली राहिली त्यांनी आपल्या कारकिर्दीत जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्याच्या काही भागात पाणी पुरवठ्याची कामगिरी केली. त्यांच्या ठिकाणी कोण अधिकारी येणार आहे, हे मात्र अद्याप समजू शकले नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागात जिल्हा परिषद परभणीत कार्यरत असलेले डी.ए.घुगे यांची ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद  बुलढाणा येथे बदली झाली आहे. नविन ठिकाणी रुजू होण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ कार्यमुक्त करावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. 

चंदनखेडे यांची बदली व पतंगे येणार

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग परभणी येथील उपअभियंता डी.एम.चंदनखेडे यांची ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग मौदा जि.प.नागपुर येथे बदली झाली आहे. तसेच मुख्य अभियंता कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथून उपअभियंता एम.पी.पतंगे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग परभणी या रिक्त पदावर येत आहेत.