Chikhali Samadhan Shibir: शासनाच्या विविध लोककल्या

चिखलीत २१ जुलै रोजी भव्य 'समाधान शिबिराचे' आयोजन; एकाच छताखाली मिळणार विविध शासकीय योजनांचा लाभ

Chikhali Samadhan Shibir

तहसीलदार विजय सवडे यांचे तालुक्यामधील नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रम

चिखली (Chikhali Samadhan Shibir) : सर्वसामान्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सुटावेत आणि शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली मिळावा, या उद्देशाने चिखली तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. ​राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त हे भव्य शिबिर मंगळवार, दिनांक २१ जुलै २०२६ रोजी चिखली मंडळातील 'मौनी बाबा संस्थान, चिखली' येथे आयोजित करण्यात आले आहे. चिखली तालुक्यामधील सर्व नागरिकांनी व शेतकऱ्यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन चिखलीचे तहसीलदार विजय सवडे यांनी केले आहे. शिबिरात मिळणारे प्रमुख लाभ आणि सेवा: ​या भव्य समाधान शिबिरामध्ये प्रशासनाच्या विविध विभागांमार्फत खालील महत्वपूर्ण योजनांचे लाभ आणि प्रमाणपत्रे जागेवरच प्रदान केली जाणार आहेत: * ​शेतकरी व जमीन महसूल विषयक सेवा: ​राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देण्याबाबतच्या पत्रांचे वाटप. ​'जिवंत सातबारा' मोहीम आणि डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ फेरफार वाटप. ​शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी फी पूर्णपणे माफ. ​मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना आणि मोजणी शिट क प्रत वाटप. ​तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक क्षेत्र घोषणा. ​PM किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे Land Seeding करणे. ​Agristack अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) तयार करणे. ​महा DBT पोर्टलवरील वैयक्तिक लाभाच्या योजना (फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, कोल्ड स्टोरेज, शेततळे, सिंचन साधने इत्यादी). * ​प्रमाणपत्रे व ओळखपत्रे वितरण: ​उत्पन्न, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर, राष्ट्रीयत्व, वयाचा दाखला व अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्रे. ​शेतकरी दाखला, भूमिहीन दाखला आणि ऐपत प्रमाणपत्र वितरण. ​नवीन आधार नोंदणी व आधार कार्ड अद्ययावत (Update) करून देणे. ​नवीन मतदान कार्ड वाटप आणि आधार-मतदान कार्ड जोडणी करणे. ​जन्म-मृत्यू नोंद आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्रे प्रदान करणे. * ​घरकुल व भूमी हक्क योजना: ​गावठाणातील नागरिकांना 'स्वामित्व देण्याची सनद' वाटप करणे. ​प्रशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे. ​पंतप्रधान आवास योजना व इतर राज्यस्तरीय घरकुल योजनांचा लाभ. ​सिंधी विस्थापितांच्या निवासी व व्यावसायिक जमिनी फ्री-होल्ड करण्यासाठी 'विशेष अभय योजना-२०२५' ला मिळालेल्या एक वर्षाच्या मुदतवाढीचा लाभ. * ​कल्याणकारी व सामाजिक सुरक्षा योजना: ​राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना. ​संजय गांधी निराधार योजना आणि विशेष सहाय्य योजनांतर्गत आधार Validation ची कार्यवाही व लाभ. ​कुंभार समाजातील व्यक्तींना पारंपरिक व्यवसायासाठी विशेष सवलती. ​गावातील अकुशल व्यक्तींना 'जॉबकार्ड' प्रदान करणे. * ​पुरवठा व आरोग्य विभाग: ​नवीन रेशन कार्ड, रेशन कार्ड दुरुस्ती किंवा नाव कमी करून 'डिजिटल रेशन कार्ड' प्रदान करणे व रेशन कार्ड eKYC करणे. ​'आभा कार्ड' (ABHA Card) तयार करून देणे. ​प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभ. ​मोफत आरोग्य तपासणी आणि लसीकरण. ​  नागरिकांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा यासाठी हे महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. चिखली तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी २१ जुलै रोजी मौनी बाबा संस्थान येथे उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा." -विजय सवडे तहसीलदार चिखली