Smart meter Andolan: महावितरण कंपनीने खाजगीकरणाच्य

स्मार्ट मिटर विरोधात राकाँ (श.प.) पक्षाचे तुडवा आंदोलन

Smart meter Andolan

अधिक्षक अभियंता यांना निवेदन; सक्तीचे स्मार्ट मिटर नको

परभणी (Smart meter Andolan) : महावितरण कंपनीने खाजगीकरणाच्या वाटचालीत स्मार्ट मिटर बसवण्याची योजना राबविली आहे. विज दरवाढ, स्मार्ट मिटरच्या  रुपाने महावितरण ग्राहकांच्या खिशातून पैसे वसुल करत आहे. त्यामुळे या स्मार्ट मिटरना विरोध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आज गुरूवार १६ जुलै रोजी अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर स्मार्ट मिटर तुडवा आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. महावितरणने सर्वत्र स्मार्ट मिटर लावण्याची मोहिम सुरू केली आहे. या स्मार्ट मिटरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांने विरोध करत तुडवा आंदोलन करून विविध मागण्या यामध्ये ग्राहकांचे पोस्टपेड मिटर कायम ठेवण्यात यावे, प्रस्तावीत स्मार्ट मिटरचे मॉडेल, उत्पादक कंपनी, मान्यता व प्रमाणपत्राची प्रत सादर करावे, संबंधित मिटरच्या अचुकता चाचणी व कॅलिबे्रेशन अहवालाची प्रत सादर करावी, स्मार्ट मिटरद्वारे संचलित होणारा ग्रहाक डेटा कोणत्या सर्व्हरवर साठविला जाणार याची माहिती द्यावी, ग्राहकाच्या वापराच्या माहितीचे संरक्षण या संबंधिीचे धोरण ठरविणे, रिमोट डिस्कनेक्शन करण्याचे अधिकार, प्रक्रिया व त्यासंबंधी लागू नियमांची माहिती देणे, स्मार्ट मिटरमध्ये बिघाड झाल्यास ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण व भरपाई नियमांची माहिती देणे, स्मार्ट मिटर बसविणे बंधनकारक असल्यास त्या संबंधीचा कायदा शासन निर्णय, इतर वैधानिक आदेशांची प्रत देणे, महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे अपघात, मृत्यूस कारणीभूत असलेल्या लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, जिल्ह्यातील डी.पी.चोरी बाबत गांभीर्याने लक्ष घालण्यात यावे या मागण्याबाबत तातडीने कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. 

यावेळी रा.काँ.(श.प.) प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे, माजी खा.फौजिया खान, माजी आ.विजय गव्हाणे, माजी आ.सुनिल भुसार, जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे, भिमराव हत्तीअंबीरे, सुशिल कांबळे, सय्यद युनूस, सोनाली देशमुख, संतोष बोबडे, पंकज बोराडे, प्रदिप वाव्हळे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.