Hingoli Loan Waiver Protest: हिंगोलील धनगरवाडीत शा

धनगरवाडीत शासनाच्या कर्जमाफी जीआरची होळी; सरसकट कर्जमाफीची मागणी

Hingoli Loan Waiver Protest

हिंगोली/ सेनगाव (Hingoli Loan Waiver Protest) : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे शेतकरी बांधवांनी शासनाच्या कर्जमाफीच्या जीआरचा तीव्र निषेध नोंदवला. शासनाचा जीआर फसवा असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी त्याची प्रतीकात्मक होळी केली आणि सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी एल्गार पुकारला.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला धनगरवाडी येथील शेतकऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही अटी व शर्तीशिवाय सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्याची शासनाने तात्काळ दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात, अशी आग्रही भूमिका आंदोलकांनी मांडली. 

आंदोलनात सहभागी मान्यवर: या आंदोलनात सरपंच विनोद विरकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश उत्तमराव खडसे यांच्यासह संजय कुरुवाडे, भगवान बोरकर, दाजीबा जगताप, राजू कोरडे, कैलास खडसे, गणेश खडसे, सचिन कुरुवाडे, गजानन गणेश खडसे, सुरेश रघुनाथ कुरवाडे, गजानन गायकवाड, रामकृष्ण महाराज खोरणे व धनगरवाडीतील असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते. "शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही," असा निर्धार यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांनी व्यक्त केला.