Woman Lightning Death: डिग्रास कऱ्हाळे येथे शेतकरी

डिग्रस कऱ्हाळे येथे वीज अंगावर पडल्याने महिला जखमी, पती बचावला

Woman Lightning Death

हिंगोली (Woman Lightning Death) : हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे शेतात काम करताना वीज अंगावर कोसळून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी, २९ जून रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. निशा दादाराव शेळके असे जखमी महिलेचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, निशा शेळके व त्यांचे पती दादाराव शेळके हे शेतात काम करत होते. दुपारनंतर अचानक पावसाला सुरुवात झाल्याने दोघेही आंब्याच्या झाडाखाली थांबले. त्याचवेळी अचानक कडाडून वीज कोसळली आणि निशा शेळके यांच्या अंगावर पडली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे. सुदैवाने त्यांचे पती दादाराव शेळके पाऊस सुरू असताना शेतातील साहित्य जमा करण्यासाठी झाडापासून काही अंतरावर गेले होते. त्यामुळे त्यांना कोणतीही इजा झाली नाही. 

दरम्यान, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. शेतात काम करताना वीज कोसळण्याच्या घटना वाढत असल्याने शेतकऱ्यांनी पावसाळ्यात झाडाखाली थांबू नये, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. या (Woman Lightning Death) घटनेमुळे डिग्रस कऱ्हाळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.