वाहतूक नियंत्रण शाखेतील 'तो' पोलीस अखेर निलंबित!
लातूर (Latur Traffic Police) : शहरात वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलने मिनी मार्केट भागात चुकीच्या पद्धतीने मोटार सायकल स्वारास थांबविण्याचा प्रयत्न केल्यानंतर मोटार सायकलस्वार दुभाजकावर आदळल्याची घटना माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेत अखेर त्या कॉन्स्टेबलला निलंबित केले आहे. विशेष म्हणजे विभागीय चौकशीचे आदेशही पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. 7 जून रोजी मिनी मार्केट येथे वाहतूक नियंत्रण शाखेतील अंमलदार पोकॉ/820 शरद कांदे हे (Latur Traffic Police) वाहतूक नियमानासाठी थांबले असता त्या ठिकाणी एका मोटरसायकल स्वारास चुकीच्या पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो पडल्याचे क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्या (Latur Traffic Police) प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री.अमोल तांबे, पोलीस अधीक्षक लातूर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांना यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. साळवे यांनी चौकशी अहवाल सादर केला असून त्यामध्ये पोलीस अंमलदार शरद कांदे यांनी कसुरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना तात्काळ निलंबन करून विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.