NEET exam scam: नीट पेपर घोटाळ्यातील आरोपी आरसीसीच

नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी लातूरमध्ये मनसेची निदर्शने

NEET exam scam

लातूर (NEET exam scam) : नीट पेपर घोटाळ्यातील आरोपी आरसीसीचे संचालक शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेनेच्या वतीने अंडा फेक करीत निदर्शने करण्यात आली. मंगळवारी लातूर येथील आरसीसी कोचिंग क्लासेसच्या मुख्यालयासमोर मनसेचे शहराध्यक्ष मनोज अभंगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. लाखों विद्यार्थ्यांचे नुकसान या पेपर फुटीमुळे झाले असून महाराष्ट्रामध्ये 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या क्लास मधील हजारो विद्यार्थ्यांची फीस परत मिळावी व त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ न देता त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी (NEET exam scam) आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी मनसे शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष भागवत शिंदे, शहराध्यक्ष मनोज अभंगे, रेणापूर नगरपंचायत नगरसेवक वाहेदभाई शेख, लातूर शहर संघटक बजरंग ठाकूर, अनिल जाधव, जहांगीर शेख, सय्यद सरफराज, ध्रुव महापूरकर, रवी पांचाळ, इंद्रजीत माने, गफ्फार शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.