कर्जमुक्तीसाठी लातूर जिल्हा बँकेचे ३५ हजार ४०९ शेतकरी पात्र!
पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण (E-Kyc) करावी: जिल्हा बँक अध्यक्ष श्री धीरज देशमुख यांचे आवाहन
लातूर (Latur District Bank) : नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दि. ०२ जून २०२६ शासन निर्णयानुसार “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६” जाहीर केलेली आहे. जिल्हा बँकेचे मार्गदर्शक तथा सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख व राज्याचे सहकारी मंत्री मा.ना. बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेअंतर्गत प्रसिद्ध झालेल्या पहिल्या व दुसऱ्या यादीमध्ये लातूर जिल्हा बँकेचे ३५ हजार ४०९ शेतकरी पात्र ठरलेले असून रु. २१९ कोटी रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्राप्त यादीपैकी आजपर्यंत २२ हजार २८४ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (E-Kyc) पूर्ण केलेले आहे. अद्यापही १३ हजार १२५ शेतकऱ्यांनी (E-Kyc) पूर्ण केलेले नाही. कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी यादीतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण (E-Kyc) करून घ्यावे असे आवाहन बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी केलेले आहे. शेतकऱ्यांनी ऍग्री स्टॅक आयडी स्टार आयडी आधारप्रमाणित करावे या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित पात्र शेतकऱ्यांचा 'ॲग्रीस्टॅक आयडी' असणे व आधार प्रमाणीकरण (E-Kyc) करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील ८९३४ शेतकऱ्यांनी अजूनही 'ॲग्रीस्टॅक' मंचावर नोंदणी न केल्यामुळे त्यांचा फार्मर आयडी निघाला नसल्यामुळे त्यांचे आधार प्रमाणीकरण (E-Kyc) होऊ शकलेले नाही, त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपले 'ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी' काढून घ्यावेत व आधार प्रमाणीकरण (E-Kyc) करून कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेच्या वतीने करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शेतजमीन उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांचे 'ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी' निघणे कठीण असल्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय पात्र ठरलेले शेतकरी तालुका शेतकरी संख्या रक्कम अहमदपूर ५३०३ ३४ कोटी २१ लाख औसा ५०२६ ३१ कोटी २८ लाख चाकूर ४३०९ २५ कोटी ०१ लाख देवणी १८७० १० कोटी ३४ लाख जळकोट १९३२ ११ कोटी ३० लाख लातूर ३६१८ २४ कोटी ७२ लाख निलंगा ५६२३ ३४ कोटी ३२ लाख रेणापूर १४३० ०९ कोटी ०१ लाख शि.अनंतपाळ २२९९ १५ कोटी ५६ लाख उदगीर ३९९९ २३ कोटी २९ लाख एकूण = ३५४०९ २१९ कोटी ०४ लाख