फसव्या कर्जमुक्ती आदेशाची लातूरमध्ये होळी!
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन : तुपकरांच्या अन्नत्यागास पाठिंबा रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा
लातूर (Farmers' Organization Protest) : शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमुक्ती मिळाली पाहिजे आणि हक्काचा पीकविमा मिळाला पाहिजे, या मागण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास समर्थन देत लातुरात मंगळवारी क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून प्रदेश अध्यक्ष राजीव कसबे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने नुकताच कर्जमुक्तीचा जीआर काढला असून त्यात अनेक जाचक अटी व शर्थी घालण्यात आलेल्या असल्याने (Farmers' Organization Protest) शेतकऱ्यांची घोर फसवणूक केलेली आहे. शेतकऱ्यांना याचा कसलाच फायदा होणार नाही. उद्योगपतीचे लाखों कोटींचे कर्ज विना अट माफ केले जात असताना शेतकऱ्यांना मात्र जाचक अटी घालून उद्ध्वस्त करायचे काम सरकार करीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. जाती जातीत भांडणे, धर्मा धर्मात भांडणे लावून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र येऊ देऊ नये, असा डाव सरकार खेळत आहे. पीकविमा नाही, शेतीमालाला भाव नाही, शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत आहे याचं सरकारला काहीही देणं-घेणं राहिलेले नाही. रविकांत तुपकर बेमुदत अन्न त्याग आंदोलनास (Farmers' Organization Protest) बसलेले असून त्यांच्या जीविताचे बरे वाईट होण्याची वाट सरकार बघत आहे की काय? असा सवाल सुद्धा महाराष्ट्रतील जनता करीत आहे. संघटना फोडाफोडी पक्ष फोडा फोडी, असे अनेक प्रयोग करुन त्यात सरकार यशस्वी झाले आहे. परंतु शेतकरी कष्टकरी एकजूट होऊन सरकारचे मनसुबे उधळून लावतील. आता लढाई आरपारची असेल, शेतकऱ्याच्या नादाला सरकारने लागू नये, असा इशारा आंदोलकांनी देत तात्काळ सरसकट विनाअट कर्जमुक्ती करुन हक्काचा पीकविमा द्यावा आणि रविकांत तुपकर यांच्या अन्न त्याग आंदोलनाची दखल घ्यावी; अन्यथा गणिमी काव्याने राज्यात काही ही घडेल याची जबाबदारी सरकार वर असेल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
या (Farmers' Organization Protest) आंदोलनात प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, कार्याध्यक्ष सत्तार पटेल, कोअर कमिटी सदस्य राजेंद्र आबा मोरे, जिल्हाध्यक्ष अरुणदादा कुलकर्णी, नवनाथ शिंदे, प्रज्योत हुडे, शाम जाधव, सतीश राठोड, इमाम सय्यद, विशाल ढोबळे, बालाजी सूर्यवंशी, गौतम कांबळे, दत्ता किणीकर, आदेश कसबे, बालाजी हौळ पाटील, मारुती कसबे धनराज घुटे, सावन गवळी, शिवाजी कसबे, प्रवीण गायकवाड, सतीश चोरमले, एम. एम. जगताप, बबलू शेख, आकाश घुटलकर सहभागी झाले होते.
नेत्यांवर सरकारची पाळत: राजीव कसबे
देशात शांतता, कायदा सुव्यवस्था बिघडलेली असून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्यांवर पाळत ठेवली जात असून रविकांत तुपकर यांना अडचणीत आणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असून त्यांच्या जीवितास काही बरे वाईट झाले तर राज्यात आगडोंब उसळून लोकच कायदा हातात घेतील व नेपाळ सारखी अवस्था देशात उद्भवेल, म्हणून सरकारने तात्काळ हस्तक्षेप करुन मार्ग काढावा; अन्यथा राज्य भर तीव्र उद्रेक होईल, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजीव कसबे यांनी दिला आहे.