दोन दूचाकीची समोरासमोर धडक; एक ठार, एक गंभीर जखमी
हेल्मेट घातले असते तर वाचू शकले असते प्राण
कूरखेडा (Bike Accidental Death) : कुरखेडा वाकडी मार्गावरील नगरपंचायतचा (dumping yard) डंपींगं यार्ड समोर दोन दूचाकीची समोरा समोर धडक झाल्याने डोक्याला जबर मार लागल्या मुळे एका दूचाकी (death) चालकाचा घटणास्थळावरच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ७.३० वाजेचा सूमारास घडली मृतकाचे नाव धर्मराज तूळशीराम बोदेले वय ३७ रा.गोठणगांव असे आहे तर अपघातात दूसरर्या दूचाकी चालक कासकर हे गंभीर जखमी झाले आहेत.
कासकर हे कोरची येथील आदिवासी विकास महामंडळाचा कार्यालयात (Tdc office) विपणन निरीक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे त्याना गंभीर अवस्थेत येथील उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे, परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरी ला (refer)हलविण्यात आले अशी माहिती समोर आली आहे.या अपघाताची नोंद पोलिस स्टेशनला (police station) झाली असून पुढील तपास (enquiry )सुरू आहे.