कन्हान येथे 'कौशल्य विकास व स्वयंरोजगार' मार्गदर्शन शिबिर सपन्न
कन्हान (Skill Development Camp) : स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीं ना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी 'कन्हान युथ फाउंडेशन' व 'प्रहार जनशक्ती पक्ष' यां च्या संयुक्त विद्यमाने वैष्णवी मंगल कार्यालय कन्हान येथे भव्य 'कौशल्य विकास, प्रशिक्षण, स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन शिबिर' संपन्न झाले.
वैष्णवी मंगल कार्यालय कन्हान येथे भव्य 'कौशल्य विकास, प्रशिक्षण, स्वयंरो जगार व उद्योजकता मार्गदर्शन शिबिर' कार्यक्रमाचे उद्घाटन मा. सिद्धार्थजी गायकवाड प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपुर, मा. चेतन मेश्राम सिनिअर मेडिकल ऑफिसर, मा. सुशील बन्सोड उप शिक्षणाधिकारी, मा. किशोर बेलसरे, श्रीराम नांदुरकर यांच्या हस्ते महापुरुषांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या (Skill Development Camp) कार्यक्रमाचे प्रस्ताविक कन्हान युथ फाऊंडेशन चे संयोजक कॅप्टन सतीश बेलसरे यांनी केले.. याप्रसंगी बोलताना मा. सिद्धार्थजी गायकवाड यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, "युवकांनी केवळ नोक. रीच्या मागे न लागता कौशल्य विकासावर भर देऊन स्वतःचे उद्योग उभारावेत."असे कथन केले. तसेच व्यावसायिक प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.कार्य क्रमाचे अध्यक्ष एमसीइडी नागपुर विभागीय अधिकारी एच. आर. वाघमारे आणि जिल्हा प्रकल्प अधिकारी पंकज ठाकरे, अण्णाभाऊ साठे महामंडळ जिल्हा व्यवस्थापक चक्रवर्ती उके, हृदय गोडबोले समता प्रति ष्ठान, समीर रामटेके, सुमीत मेश्राम आणि सम्राट समर आदींनी मार्गदर्शन केले.
शिबिरात (Skill Development Camp) विविध योजनांच्या माहितीसाठी विशेष स्टॉल्स लावण्यात आले होते. यात प्रामुख्याने कौशल्य विकास केंद्र, मॉडेल करिअर सेंटर (लाईट हाऊस), इत र मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, महाज्योती नागपुर, विशेष आकर्षण 'तेनु' हस्तनिर्मित अहिंसक वस्त्र - आदित्य जैन व पारस जैन आणि स्वतःचा मसाला उद्योग - दिगंबर हारगुडे. शासनाच्या विविध महामंडळांच्या योजना, स्वयंरोजगार, कर्ज प्रक्रिया व महिला बचत गटांच्या बळकटीकरणाबाबत तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली. जिल्हा उद्योग केंद्र, एमसीइी नागपुर आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष योजनेचा लाभ कसा घ्यावा याचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले.
माहिती स्टॉल्सना तसेच संपुर्ण शिबीराला परिस रातील नागरिकांचा मोठया प्रमाणात चांगला प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे संचालन हरिश पोटभरे आणि आभार प्रदर्शन निलेश भरणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अश्वमेघ पाटील, पुरुषोत्तम बेले, सूर्य भान फरकाडे, शैलेश झेंडे, गणेश रामापुरे, आकाश भगत, रोतेश पात्रे, देविदास तडस, प्रणय बावनकुळे, अमित बेलसरे, राजु राऊत, सुवर्णा रामापुरे, निलिमा फरकाडे, राधिका झेंडे, भूमिका भरणे, सरोज गौरखेडे, सागरिका बेलसरे, विमल मालाधरे, राजश्री पाटील, मीनाक्षी पोटभरे, प्रतिक्षा कोराम आदी सह कन्हान युथ फाउंडेशनच्या चमुने परिश्रम घेतले.