Kalamnuri Student Suicide: प्रविण विश्वनाथ खुडे (व

कळमनुरीत बी.ए.च्या विद्यार्थ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

Kalamnuri Student Suicide

कळमनुरी (Kalamnuri Student Suicide) : कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याची वाडी येथील प्रविण विश्वनाथ खुडे (वय 21) हा समर्थ महाविद्यालय, हिंगोली येथे बी.ए. द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. तो सकाळी घरातून "कॉलेजला जात आहे" असे सांगून निघाला होता. मात्र, कळमनुरी शहराजवळ उमरा पाटील परिसरातील राष्ट्रीय महामार्गालगत एका शेतात झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.

घटनेची (Kalamnuri Student Suicide) माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जमीर नाईक, पोलीस हवालदार दिलीप पोले तसेच गुंजकर, जाधव व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ही आत्महत्या नसून प्रविणचा घातपात करण्यात आल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाचा सर्वंकष तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी सांगितले की, शवविच्छेदन (पोस्टमार्टेम) अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नातेवाईकांचा घातपाताचा आरोप हा त्यांचा दावा आहे. अधिकृतरीत्या मृत्यूचे कारण पोस्टमार्टेम अहवाल आणि पोलिस तपासानंतरच स्पष्ट होईल.