जामदया येथील शाळेच्या वर्ग खोल्यांसाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयात मांडला ठिय्या
हिंगोली (Jamdaya Zilla Parishad Office) : सेनगाव तालुक्यातील जामदया येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्याचे बांधकाम करण्यासाठी ग्रामस्थांनी २९ जुन सोमवार रोजी जिल्हा परिषदेत ठाण मांडत बांधकाम करण्यासाठी निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, जि. प. प्रा. शा. जामदया केंद्र खिल्लार ता. सेनगांव येथे 1 ली ते 8 वी चे वर्ग असून पटसंच्या 160 आहे परंतू शाळेच्या 8 वर्ग खोल्या अतिशय धोकादायक स्थितीत आहेत. त्या वर्ग खोल्यामध्ये विद्यार्थ्यांना बसवता येत नाही. वर्गखोल्यांच्या भिंती व पत्रे अतिशय मोडकळीस आल्यामुळे वर्गखोल्या कोसळु शकतात व पावसाळाच्या दिवसात वर्गखोल्या गळतात.
तसेच सण 2024 मध्ये शाळा बांधकामाबाबत कार्यारंभआदेश आलेला आहे. परंतू प्रत्यक्षात बांधकामास सुरुवात झाली नाही. त्यामुळे वर्ग खोल्यांच्या बांधकामास निधी देऊन बांधकाम सुरु करावे अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे. सदरील चौकशी व पाहणी न झाल्यास (Jamdaya Zilla Parishad Office) शाळेला कुलूप लावून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर बाबाराव पोटफोडे, रमेश तनपुरे, संजय गव्हाणे, केशव तनपुरे, उमेश पिंपरकर, रमेश गव्हाणे, नंदु नवघरे, तानाजी नवघरे, ओंकार कोळेकर,सुरज नवघरे, मारोती नवघरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.