हिंगोलीत 18 जूनला 'हेल्थ अवेअरनेस' सेमिनार; JIN रिफ्लेक्सोलॉजीचे जनक अनिल जैन यांचे मार्गदर्शन
हिंगोली (Hingoli 'Health Awareness' Seminar) : नागरिकांच्या आरोग्य जागृतीसाठी 'हेल्थ अवेअरनेस अँड लाईफ चेंजिंग सेमिनार'चे आयोजन करण्यात आले आहे. सकल जैन समाज व सर्वधर्मीय हिंगोलीवासी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, 18 जून 2026 रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत श्री महावीर भवन, रामलीला मैदान येथे हा 100 मिनिटांचा जीवन बदलणारा सेमिनार होणार आहे.
JIN रिफ्लेक्सोलॉजीचे संशोधक जे. आर. अनिल जैन हे या सेमिनारचे प्रमुख वक्ते असतील. हजारो लोकांवरील संशोधनात्मक कार्यावर आधारित हा सेमिनार असून आतापर्यंत देशभरात 195 सेमिनार यशस्वी झाले आहेत. हा 196 वा सेमिनार आहे. 'आपले निरोगी जीवन हीच आमची प्राथमिकता' या उद्देशाने 1 ते 21 जून 2026 दरम्यान जिन रिफ्लेक्सोलॉजी दिवस साजरा केला जात आहे.
कार्यक्रमाचे प्रायोजक जैनरत्न संघवी इंदरचंद प्रेमराजजी सोनी, धरमचंद प्रसन्नकुमार बडेरा, सुभाषचंद प्रेमराज सोनी, जैनरत्न सुधाकर भानुसा साकळे, श्री प्रा. जयेंद्रकुमार छोटालाल शाह व नेमीचंद नवीनकुमार सोनी आहेत.
इंटरनॅशनल रिफ्लेक्सोलॉजी JIN असोसिएशनशी संलग्न असलेल्या या (Hingoli 'Health Awareness' Seminar) कार्यक्रमास कुटुंबासह उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रकाश सोनी 9422176610, प्रसन्नकुमार बडेरा 9422175265, अँड. मनिष साकळे 9422178389, किशोर सोनी 9822286221, डॉ. अमीत शाह 9850388044, प्रविण सोनी 8087430430 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.