Udgir Extortion Case: उदगीर जिल्ह्यातील अत्यंत गंभ

धमकी देत तब्बल ₹१.३० लाखांची खंडणी उकळली; उदगीर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

Udgir Extortion Case

उदगीर (Udgir Extortion Case) : लातूर जिल्ह्य़ातील उदगीर येथे स्त्रीवेषातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणाकडून टप्प्याटप्प्याने १ लाख ३० हजारांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या (Udgir Extortion Case) प्रकरणातील फिर्यादी रमन सुनील वाकोडे (वय २३, रा. बनशेळकी रोड, उदगीर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, स्वप्नील सतीश सगर (वय २३, रा. येणकी मानकी रोड, उदगीर) याने फिर्यादीचे स्त्रीवेषातील फोटो मिळवून ते फेसबुक व व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्याची धमकी दिली. ही धमकी देत आरोपीने दोन वेळा ३० हजार आणि एकदा ७० हजार, अशी एकूण १ लाख ३० हजारांची रोख रक्कम खंडणी म्हणून घेतल्याचा आरोप आहे. हा प्रकार कौळखेड रोडवरील गणेशनगर पाटीजवळील नाल्याच्या परिसरात घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादीने सोमवारी (दि. २७ जुलै) पोलिस ठाण्यात हजर राहून जबाब दिल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलिसांनी घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.