आमदार संतोष बांगर यांच्याकडून शेकडो युवकांसह विठ्ठलाचे दर्शन
पंढरपूरच्या वाटेवर; माऊलीच्या दिंडीत रंगले भजन आणि फुगडी
हिंगोली (MLA Santosh Bangar) : व्यापारी व जिमचे युवकही सहभागी हिंगोली कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोषराव बांगर यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले. विशेष म्हणजे, यंदा आमदार बांगर यांनी हिंगोली शहरातील विविध जिममधील (व्यायामशाळा) शेकडो युवक, नवतरुण आणि स्थानिक व्यापाऱ्यांना सोबत घेऊन हे विठ्ठल दर्शन घडवून आणले. पंढरपूरला जात असताना रस्त्यामध्ये माऊलींच्या दिंड्यांचे दर्शन घेताना आमदार संतोष बांगर स्वतःला रोखू शकले नाहीत. विठ्ठल नामाच्या जयघोषात मग्न होऊन त्यांनी वारकऱ्यांसोबत मनसोक्त भजन केले, तसेच दिंडीमध्ये फुगडी खेळण्याचा आनंदही लुटला. त्यांच्या या भक्तीमय रूपाने उपस्थित वारकऱ्यांची मने जिंकून घेतली.
बांगर कुटुंबियांची पायी वारी मागील ८ ते १० दिवसांपासून आमदार बांगर (MLA Santosh Bangar) यांचे मोठे बंधू तथा शिवसेना नगरसेवक गटनेते श्रीरामदादा बांगर आणि त्यांच्या पत्नी सौ. रेखाताई बांगर (नगराध्यक्ष, हिंगोली) या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या दर्शना दरम्यान आमदार बांगर यांच्यासोबत हिंगोली नगरपालिकेचे शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम, तालुकाप्रमुख शेळके, शासकीय कंत्राटदार मयूर कयाल, बाळू गव्हाणे, सुमित चौधरी, पवन मुंदडा, गिरीश गुंडेवार, सोनी, विशाल व्यायामशाळेचे वस्ताद भरत चौधरी, पंकज सोनी, मुरली हेडा, संतोष बांगर, पवन खंडेलवाल, विशाल वर्मा, राजू बगडिया आणि अमित हेडा यांच्यासह हिंगोलीतील अनेक मान्यवर व तरुण उपस्थित होते. 'ज्ञानोबा-तुकाराम' आणि 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल'च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता