Hingoli Police: जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोह

पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण कार्यमुक्त; अप्पर पोलिस अधिक्षकांकडे प्रभारी पदभार

Hingoli Police

हिंगोली (Hingoli Police) : जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांची नांदेड येथे बदली करण्यात आली. त्यामुळे त्यांना बुधवारी २४ जून रोजी कार्यमुक्त करण्यात आले असुन त्यांचा प्रभारी पदभार अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्याकडे सोपविण्यात आला. नूतन पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा हे आज गुरूवारी रूजू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  २३ जून मंगळवार रोजी राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या. ज्यामध्ये हिंगोलीचे पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांची बदली झाल्याने २४ जूनला त्यांना कार्यमुक्त केल्याने ते नांदेडला रुजू झाले. त्यांच्या रिक्त जागेवरील खामगाव - बुलढाणा येथील अप्पर पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांची हिंगोलीत पोलिस अधिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. आज २५ जून गुरूवार रोजी ते रूजू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.