SP Shrenik Lodha: हिंगोली जिल्हा औद्योगिक संघटनेच्

हिंगोली जिल्हा औद्योगिक संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांचा सत्कार

SP Shrenik Lodha

हिंगोली (SP Shrenik Lodha) : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच उद्योगांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिल्याबद्दल हिंगोली जिल्हा औद्योगिक संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्रेणिक लोढा (IPS) यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात उद्योगांच्या समस्या आणि सुरक्षा विषयावर चर्चा करण्यात आली. पोलीस प्रशासनाकडून उद्योगांना सातत्याने सहकार्य मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या सत्कारप्रसंगी हिंगोली जिल्हा औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मामडे, सचिव  प्रवीण सोनी,  नितीन राठौर,  रमेश पंडित, कीर्ती उद्योग समूहाचे  चीकटे यांच्यासह जिल्ह्यातील विविध उद्योगांचे उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्योजकांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले आणि पुढील काळातही अशाच प्रकारचे सहकार्य अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले.