SP Shrenik Lodha: हिंगोली जिल्ह्यांत नूतन पोलिस अध

हिंगोलीचे नूतन पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी स्विकारला पदभार

SP Shrenik Lodha

हिंगोली (SP Shrenik Lodha) : खामगाव- बुलढाणा येथील अप्पर पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांची हिंगोली जिल्हा पोलिस अधिक्षक पदी पदोन्नतीवर बदली झाली असताना २५ जून गुरूवार रोजी त्यांनी आपला पदभार स्विकारला.  हिंगोलीचे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांची नांदेड येथे बदली झाल्याने २४ जूनला त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यांचा प्रभारी पदभार अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्याकडे सोपविण्यात आला. बुलढाणा - खामगावचे अप्पर पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांची हिंगोलीत पदोन्नतीवर बदली झाल्याने २४ जूनला रात्रीला ते हिंगोलीत दाखल झाले. २५ जून रोजी त्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांनी त्यांच्याकडे पदभार सोपविला. यावेळी प्रशिक्षणार्थी पोलिस उपाधिक्षक मयुर रसाळ, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक संदिप मोदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, गृहपोलिस उपाधिक्षक दत्ता केंद्रे यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी व मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते. 

पदभार स्विकारताच विविध शाखांचा आढावा घेऊन जाणल्या अडीअडचणी  नूतन पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी २५ जूनला आपल्या पदाचा पदभार स्विकारला. हा पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखा आर्थिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, सायबर सेल, वाचक शाखेसह अन्य शाखा मधील अधिकारी व कर्मचार्‍यांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या.