मुले चौकात बसण्याच्या कारणातून 42 वर्षीय महिलेचा विनयभंग व मारहाण
हिंगोली (Hingoli Woman Molestation) : मुले चौकात बसल्याच्या क्षुल्लक कारणावरून 4 जणांनी एका 42 वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची तसेच साक्षीदारांना मारहाण केल्याची घटना हिंगोली शहरात घडली आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 जुलै रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी 42 वर्षीय महिला तिच्या राहत्या घरी असताना आरोपींनी संगनमत करून घरात अनधिकृत प्रवेश केला. "मुले चौकात का बसली" या कारणावरून शेख शाहरुख शेख हरून याने महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार पाहून मध्ये पडलेल्या साक्षीदारांना देखील आरोपींनी बेदम मारहाण केली. शेख शाहरुख शेख हरून, शेख फारुख शेख हरून, शेख फेरोज शेख सिराज आणि शेख रिहान या चौघांनी साक्षीदाराला थापड-बुक्क्यांनी मारले.
यामध्ये शेख शाहरुख शेख हरून याने खंजीरने साक्षीदाराच्या हातावर वार करून जखमी केले. शेख फारुख शेख हरून याने लोखंडी गजाने, शेख फेरोज शेख सिराज याने हाताच्या मनगटावर मारून, तर शेख रिहान याने चाकूने पाठीवर वार करून इतर साक्षीदारांना जखमी केले.
या (Hingoli Woman Molestation) प्रकरणी 42 वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात 10 जुलै रोजी रात्री 7.18 वाजता शेख शाहरुख शेख हरून, शेख फारुख शेख हरून, शेख फेरोज शेख सिराज, शेख रिहान यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेतील जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखालीपोलीस नाईक चिंतारे पुढील तपास करत आहेत.