Gas cylinder crisis: हिंगोलीत गॅस सिलेंडरच्या तुटव
ग्राहक सिलेंडरसह धडकले गॅस एजन्सीवर
हिंगोलीत वितरण व्यवस्था कोलमडली
हिंगोली (Gas cylinder crisis) : आखाती युध्दामुळे गॅस सिलेंडरच्या तुटवड्याला नागरीकांना सामोरे जावे लागत आहे. हिंगोली शहरात (Gas cylinder crisis) सिलेंडरची व्दारपोच योजना कोलमडल्याने अनेक गॅसधारक बुधवारी सिलेंडरसह गॅस एजन्सीवर धकडले. मध्यपुर्वेतील अमेरीका, इस्राईल आणि इराणमधील सुरू असलेल्या युध्दांमुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. हिंगोलीत (Gas cylinder crisis) गॅस सिलेंडर व्दारपोच वितरण व्यवस्था कोलमडल्याने अनेक ग्राहक नारायण नगरातील एजन्सीवर सिलेंडरसह धडकले. काही जणांना सिलेंडर मिळाले तर काहींना सिलेंडर न मिळाल्याने हात हालवत घरी परतावे लागले.