Farmer Rastraroko Andolan: शक्तीपीठ महामार्गावर जा

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध:  कांडली फाटा येथे रास्तारोको आंदोलन

Farmer Rastraroko Andolan

मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी

आखाडा बाळापूर (Farmer Rastraroko Andolan) : हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध होत आहे.कळमनुरी तालुक्यातील सुपिक जमीन या महामार्गावर जात असल्याने शेतकरी वर्गातून यास विरोध वाढत आहे.आपल्या शेत जमीनी वाचल्या पाहिजे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १६ जून मंगळवारी सकाळी अकरा वाजता कळमनुरी तालुक्यातील महामार्गावर कांडली फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी परीसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या महामार्गाला आपला प्रखर विरोध दर्शविला.

 महामार्गाला शेतकऱ्यांनी कार्यकर्ते यांनी रास्तारोको आंदोलन (Farmer Rastraroko Andolan) करून शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध दर्शविला यावेळी माजी खासदार शिवाजीराव माने, माजी गटशिक्षणाधिकारी तान्हाजी भोसले, शेतकरी नेते पराग अडकीणे, कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष डॉ.सतीष पाचपुते, कॉग्रेस माजी तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख कांडलीकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ.संतोष बोंढारे,शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय पाटील, संतोष कदम, संदीप मोटेगावकर व इतर मंडळी यांनी आपल्या भाषणात शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शविला यात सुपिक जमीन जात असल्याने शेतकरी जमीन देणार नाही असे ठणकावून सांगितले. यावेळी माजी सभापती संजय पाटील बोंढारे, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय पाटील सावंत, अक्षय देशमुख,शिवसेना उपजिल्हाप्रमुख राहुल पतंगे, माजी उपसरपंच विजय बोंढारे, शिवसेना उपतालुकाप्रमुख रूपेश देशमुख,, शिवसेना उपजिल्हासंघटक सोपान पाटील , युवा नेते अभिजित देशमुख,बाबुराव वानखेडे, शेषराव बोंढारे,संजय इंगळे, नागेश बोंढारे,गोरख पानपट्टे,चंद्रकांत पानपट्टे, नामदेव पानपट्टे, जयदीप पतंगे , शहाजी पाटील, विनोद बोंढारे, सुशील बोंढारे,चंद्रशेखर सूर्यवंशी, सिताराम सूर्यवंशी, गजानन सूर्यवंशी , नामदेव पानपट्टे, गजानन शिंदे,दिलीप डुकरे, लक्ष्मण खोकले, गणेश पानपट्टे सह परीसरातील शेतकरी उपस्थित होते. विशेष म्हणजे या (Farmer Rastraroko Andolan) आंदोलनस्थळी महसूल विभाग कोणी वरीष्ठ अधिकारी आले नाही ग्राम महसूल अधिकारी एकनाथ कदम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वसमत पोलिस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, पोलिस निरीक्षक शरद मरे,सपोनी ज्ञानेश्वर बसवंते व शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक सुनील रोहीणकर, बालाजी गोणारकर, अतुल मस्के, गजानन राठोड, सह सहा अधिकारी पस्तीस कर्मचारी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.