हिंगोलीत इंधनपुरवठा मुबलक असल्याचा दावा,मात्र रांगा होईनात कमी
हिंगोली (Hingoli Diesel Shortage) : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून डिझेल टंचाई निर्माण झाली आहे सर्वच पेट्रोल पंपावर डिझेलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. इंधनपुरवठा मुबलक असल्याचा दावा केला जात आहे मात्र रांगा काही कमी होत नसल्याचे चित्र आहे.शहरातील चौधरी व नाईक पेट्रोल पंपावर डिझेलसाठी २५ मे सोमवार रोजी लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर पोलीस पेट्रोल पंप बंदच होता. जिल्ह्यात सध्या खरिपाच्या पेरणीकरिता शेतीची हंगामपूर्व मशागतीची कामे वेगात सुरू आहेत. पशुधन कमी झाल्याने बहुतेक शेतीकामे ट्रॅक्टर व इतर यंत्राच्या साह्याने करावी लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या उपलब्धते बाबत नागरिकांमध्ये चर्चा आणि चिंता निर्माण .झाली असून शहरातील चौधरी पेट्रोल पंप, नाईक पेट्रोल पंपावर शेतकर्यांच्या ट्रॅक्टरच्या व इतर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. दरम्यान, ट्रॅक्टर पेट्रोल पंपावर (Hingoli Diesel Shortage) आणण्याकरिता पाच दहा लिटर पेट्रोल लागत असल्याने अनेक शेतकरी प्लास्टिक कॅनमध्ये डिझेल घेऊन जात असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासूून डिझेल टंचाई निर्माण झाली आहे. सद्य स्थितीत शेतकर्यांची पेरणीपुर्व मशागतीच्या कामाची लगबग सुरु असल्याने सर्व कामे ट्रॅक्टरवरच अवलंबून आहेत. यामुळे ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळविण्यासाठा.शेतकर्यांना पेट्रोल पंपावरच वेळ द्यावा लागत आहे. रात्री-बेरात्री सुध्दा रांगेमध्ये उभे राहण्याची वेळ शेतकर्यावर आली आहे. डिझेल मिळत नसल्याने मशागतीचे कामे खोळंबली आहेत. मशागतीचे कामे कधी होणार याकडे आता शेतकर्याचे लक्ष लागलीे आहे. प्रशासनाने डिझेल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली जात आहे.
हिंगोलीत दोन पंपावर लांबच लांब रांगा
शहरातील चौधरी पेट्रोल पंप व नाईक पेट्रोल पंपावर ट्रॅक्टरसह इतरही वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर शहरातील पोलिस पेट्रोल पंप मात्र बंद आहे. पंप बंद असल्याने शहरात सुरु असलेल्या दोन पंपावर सकाळी भल्या पहाटेपासून शेतकरी डिझेल घेण्यासाठी ट्रॅक्टर घेवून आल्याने पंपाच्या समोर मोठी गर्दी झाली.