हिंगोलीतील शासकीय रुग्णालयाच्या छतावर बियअरच्या बाटल्या?
मुद्दाम खोडसाळ पणा केल्याचा अधिष्ठात्यांचा आरोप
हिंगोली (Hingoli Government Hospital) : येथील जिल्हा रुग्णालयाच्या छतावर बियरच्या रिकाम्या बाटल्यांचा खच सापडल्याचे वृत्त समाज माध्यमांवरून शनिवारी पहाटेपासून फिरत आहे. अधिष्ठाता डॉ. श्रीधर मुंगल यांनी मात्र हा मुद्दाम केलेला खोडसाळपणा असल्याचा आरोप केला आहे. शनिवारी पहाटेपासून हिंगोलीतील व्हॉटसअॅप ग्रुपसहीत अन्य समाज माध्यमांवर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये छतावर तीन गोणी भरून व त्याच्या आजूबाजूला अनेक बियअरच्या बाटल्या असल्याचे दिसत आहे. या फोटोसहीत शासकीय रुग्णालयात अनेक गैरसोयी असताना कर्मचारी मात्र मौजमजा करीत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या (Hingoli Government Hospital) बाबत शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्रीधर मुंगल यांनी रुग्णालयाच्या छतावर असलेल्या साहित्याचे निर्लेखन करण्यासाठी समितीने शुक्रवारी ३ जुलै रोजी तपासणी केली. यावेळी छतावर काहीच दिसून आले नाही असे स्पष्ट करून रुग्णालय प्रशासनाला अडचणीत आणण्यासाठी खोडसाळपणाने हा प्रकार केला असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या बाबत रुग्णालय प्रशासनाला सीसीटिव्हीचे फुटेज तपासून चौकशी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.