Vehicle Accidental Death: हिंगोलीतील संतुक पिंपरी

संतुक पिंपरी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचार्‍याचा मृत्यू

Vehicle Accidental Death

हिंगोली (Vehicle Accidental Death) : तालुक्यातील संतुक पिंपरी शिवारात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाने एका पादचार्‍याला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसात नोंद झाली नाही.  हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता येथील शेख अफसर शेख अब्दुल (४५) हे १७ जुलै शुक्रवार रोजी मुख्यरस्त्याने जात होते. पहाटे ५ च्या सुमारास संतुक पिंपरी शिवारामध्ये एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक राहुल घुले, जमादार सुधीर ढेंबरे, असलम गारवे, किशोर पवार यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

यानंतर शेख अफसर यांचा मृतदेह हिंगोलीतील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. घटने प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसात शुक्रवारी सायंकाळ पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.  शेख अफसर शेख अब्दुल यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.