Hingoli Accidental Death: वैभव बारजवळ झालेल्या भीष

हिंगोलीत भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Hingoli Accidental Death

हिंगोली (Hingoli Accidental Death) : शहरात वैभव बारजवळ झालेल्या भीषण अपघातात एका ४२ वर्षीय मिस्त्रीचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या जितो वाहनाने पायी जाणाऱ्या इसमाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी प्रसंग घडला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  २९ जून रोजी सायंकाळच्या सुमारास शेख अफसर शेख अली वय ४२ वर्षे हे त्यांचा मुलगा शेख इरफानसोबत हिंगोली-औंढा रोडवरील वैभव बारजवळून पायी घराकडे जात होते. त्यावेळी एम.एच. ३८ एक्स ३७१६ क्रमांकाच्या वाहनाच्या अज्ञात चालकाने निष्काळजीपणे व हयगयीने वाहन चालवत त्यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात शेख अफसर गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. 

मृताच्या अंत्यविधीनंतर फिर्यादी शेख इरफान यांनी  ३० जून रोजी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (Hingoli Accidental Death) पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला असून तपास सपोउपनि एस. एल. मार्के करत आहेत. हिंगोली शहरात बेदरकार वाहन चालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.