हिंगोलीत एकाची गळफास घेऊन आत्महत्या
हिंगोली Hingoli person suicide) : शहरातील रेल्वे स्टेशन रस्त्यावरील आरा मशीन भागातील एका ३९ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात सोमवारी सकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. (Hingoli person suicide) घटनेबाबत सायंकाळ पर्यंत नोंद झाली नव्हती. याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील रेल्वे स्टेशन रस्त्यावरील आरा मशीन भागातील संदिप दुर्गादास पिल्ले (३९) हे लाकडाचे काम करणार कारागिर असुन २५ मे रोजी सकाळी १० च्या सुमारास त्यांनी आपल्या पत्नीला नाश्ता तयार करण्या करीता सांगितले. यावेळी पत्नी नाश्ता तयार करण्याकरीता स्वयपाक घरात गेली असता संदिप पिल्ले याने खोलीमध्ये गळफास घेतला. यावेळी (Hingoli person suicide) ही बाब घरच्यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी तात्काळ संदिपला खाली उतरवून रूग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. संदिप पिल्ले यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.