Belora Nag Pille: गुठळे बेलोर्यातील खुशालराव गुठ्ठ

गुठ्ठे बेलोरा येथे एका निवासस्थानी आढळली नागाची चार पिल्ल

Belora Nag Pille

बासंबा (Belora Nag Pille) : हिंगोली तालुक्यातील गुठ्ठे बेलोरा गावातील खुशालराव गुठ्ठे यांच्या निवासस्थानी १३ जुलै  सोमवार रोजी सापाचे पिल्लू आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. सर्पमित्रांनी त्याला पकडून जीवदान दिले. गुठ्ठे कुटुंबीयांनी तात्काळ सर्पमित्र पटवेकर महाराज यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सर्पमित्र सोनू शिखरे यांना तातडीने घटनास्थळी पाठवले.  ते ‘इंडियन कोब्रा’ (भारतीय नाग) जातीचे पिल्लू असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी पटवेकर महाराज यांनी परिसरात आणखीही पिल्ले असण्याची शक्यता वर्तवली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सोनू शिखरे यांनी घराची आणि आजूबाजूच्या परिसराची कसून पाहणी केली.

अत्यंत दक्षतेने शोध घेतला असता, एकाच ठिकाणी तब्बल चार बेबी कोब्रा आढळून आले. शिखरे यांनी अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितपणे या चारही विषारी नागपुत्रांना पकडले. या मोहिमेमुळे खुशालराव गुठे यांच्या कुटुंबाने आणि ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला. मानवी वस्तीला असलेला धोका टाळत, पकडलेल्या या चारही पिल्लांना वन विभागाच्या अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले. सर्पमित्रांच्या या तत्परतेमुळे वन्यजीवांना जीवनदान मिळाले असून, गुठ्ठे बेलोरा परिसरामध्ये त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.