Ghot Forest Department Fire: घोट येथील वनविभागाच्य

घोट वनविभागाच्या लाकूड डेपोला भीषण आग; २५० ते ३०० मिश्र बिट जळून खाक…

Ghot Forest Department Fire

घोट (Ghot Forest Department Fire) : घोट येथील वनविभागाच्या लाकूड डेपोला भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून या आगीत अंदाजे २५० ते ३०० मिश्र बिट जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच तिने रौद्र रूप धारण करत संपूर्ण परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. प्राप्त माहितीनुसार, (Ghot Forest Department Fire) लाकूड डेपोच्या शेजारील शेतीमध्ये एका शेतकऱ्याने तण जाळण्यासाठी आग लावली होती.सुरुवातीला आग नियंत्रणात असल्याचे दिसत होते, मात्र काही वेळानंतर वाऱ्याची दिशा बदलल्याने आगीने अचानक मोठे स्वरूप धारण केले. बघता बघता आगीचे लोळ थेट वनविभागाच्या लाकूड डेपोकडे सरकले आणि तेथील मिश्र बिटांनी पेट घेतला.सदर बिट हे वनविभाग व जंगल कामगार संस्था पळसगाव यांच्या संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्य डेपो व्यतिरिक्त काही अंतरावर दुसऱ्या ठिकाणीही आग लागून तेथील सुमारे आठ ते दहा बिट जळाल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ चामोर्शी नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाशी संपर्क साधला.वृत्त लिहीपर्यंत अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते.