World Environment Day: जागतिक पर्यावरण दिनाची साजर

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घोट येथे वृक्षारोपण व जनजागृती रॅली; पोलीस व वनविभागाचा संयुक्त उपक्रम

World Environment Day

घोट (World Environment Day) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पोलीस मदत केंद्र घोट व वनपरिक्षेत्र कार्यालय घोट यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जून रोजी जनजागृती रॅली व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत हा उपक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात जनजागृती रॅलीने करण्यात आली. रॅलीद्वारे पर्यावरण संवर्धन,वृक्ष लागवडीचे महत्त्व व स्वच्छता याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी बसस्थानक चौकात उपस्थितांनी (World Environment Day) पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली. त्यानंतर पोलीस मदत केंद्र परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

याप्रसंगी घोट पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, घोटचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश्वर वाडीघरे, घोटच्या सरपंच रुपाली दुधबावरे,भारत स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, तमुंस अध्यक्ष दिनकर लाकडे, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आसिफ सय्यद, माहिती अधिकार पत्रकार सेनेच्या जिल्हाध्यक्ष रुम्पा शहा, उर्मिला पोगुलवार,लीना विश्वास, पत्रकार हेमंत उपाध्ये, पांडुरंग कांबळे, बबीता शहा यांच्यासह पोलीस व वनविभागाचे कर्मचारी, गावकरी आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले. (World Environment Day) वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनालाही प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.