धान खाल्याच्या संशयावरून वासराच्या डोक्यात दगड मारल्याने मृत्यू
औैंढा नागनाथ (Bhosi calf Death) : तालुक्यातील भोसी येथे शेतातील धान खाल्ल्याच्या संशयावरून गाईच्या वासराच्या डोक्यात दगड मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना ५ जुलै रविवार रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसी येथील गोविंद बडकुलाल जैस्वाल यांच्या मालकीचे वासरू गावातील बसस्थानका जवळील पडीत जागेत चरत होते. यावेळी शेतातील धान खाल्ल्याच्या संशयावरून राजकुमार मारोती चिभडे याने (Bhosi calf Death) वासराच्या डोक्यात दगड मारला या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी गोविंद बडकुलाल जैस्वाल यांनी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राजकुमार मारोती चिभडे राहणार भोसी याच्याविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात ५ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास राठोड करीत आहेत.