सध्या डिझेल, पेट्रोल तुटवडा झाल्याने अनेक वाहन चाल

डिझेल, पेट्रोल तुटवड्याने मोदी सरकार हाय हाय... च्या दिल्या घोषणा

Fuel Shortage

जिल्ह्यातील ३५ पैकी २५ पेट्रोल पंपावर साठ्याचा अभाव

हिंगोली (Fuel Shortage) : सध्या डिझेल, पेट्रोल तुटवडा झाल्याने अनेक वाहन चालक अडचणीत सापडले आहेत. त्यातच शेती कामासाठी डिझेल न मिळाल्याने हिंगोलीत संतप्त नागरिकांनी चक्क रिकाम्या कॅन डोक्यावर घेऊन “मोदी हाय.. हाय..” अशा घोषणा दिल्या.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर प्रामुख्याने डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. सध्या शेतातील अनेक कामे सुरू असल्याने वाहनांसाठी डिझेल अत्यावश्यक झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी येत असताना त्यांना डिझेल न मिळाल्याने निराश होऊन परत जावे लागत आहे.

१७ मे रोजी हिंगोली येथे डिझेलसाठी कॅन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध न झाल्याने त्यांनी काही काळ एकत्र जमून डोक्यावर रिकामे कॅन घेऊन “मोदी सरकार हाय.. हाय..” अशा घोषणा दिल्या. त्यामुळे काही वेळ आंदोलनाचे स्वरूप निर्माण झाले होते.