झटका मशीनचे तार लावण्याच्या कारणातून सवड येथे वाद
हिंगोली (Jerk Machine Argument) : तालुक्यातील सवड येथे झटका मशीनचा तार लावण्याच्या कारणातून कुर्हाड व काठ्या घेऊन एकास जीवे मारण्याची धमकी दिल्याने नर्सी नामदेव पोलिसात ९ जणांवर कारवाई करण्यात आली. सामाईक धुर्यावर आमच्या शेताकडून झटका मशीनची तार का लावतो, या कारणातून १३ जुलै सोमवार रोजी सवड शेत शिवार गट क्र. ३५७ मध्ये काही काती, कुर्हाड काट्या घेऊन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याने नर्सी नामदेव पोलिसात निखिल ईश्वर जावळे, ईश्वर नामदेव जावळे, कावेरी ईश्वर जावळे, दामोधर नामदेव जावळे, सिध्दार्थ दामोधर जावळे, सचिन दामोधर जावळे, नंदाबाई दामोधर जावळे, लिलाबाई नामदेव जावळे, नामदेव अर्जुना जावळे सर्व रा. सवड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एन. खांडेकर हे करीत आहेत.