Electricity Theft Case: हिंगोलीत, औंढा नागनाथ तालु

थकित वीज बिल व विज चोरी प्रकरणी औंढा तालुक्यातील २१ जनावर गुन्हे दाखल

Electricity Theft Case

हिंगोली (Electricity Theft Case) : थकीत वीज बिलापोटी पुरवठा खंडित केल्यानंतरही चोरी करणार्‍या औंढा नागनाथ तालुक्यातील चार गावातील एकूण २१ जनावर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे   औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी, नागझरी, येथील १२ वीज ग्राहकावर (Electricity Theft Case) अनाधिकृतपणे वीज वापर केल्याने व १३ ८७० रुपयाची वीज चोरी व ३०७३५० रुपये थकीत बिल न भरल्याने वीज ग्राहकावर व दुघाळा व जडगाव येथील ९ वीज ग्राहकावर १०३३८ वीज चोरी तसेच १५४६१० एवढ्या थकीत बीलासाठी भाऊराव लक्ष्मण ढगे, पवन सुधाकर धारकर, हैदरखॉ मिडू खॉ, गजानन गणपतराव पोले, गौतम नारायण बगाटे, हनवतराव व्दारकोजी पडोळे, सुरेश किशनराव पोले, रंजना कुंडलिक पोले, कोंडबाराव शिंदे सर्व रा. दुघाळा, उत्तम नरोजी आठवले, रशिदखान कब्बारखान पठाण, शिवाजी पांडुजी कोंडूले, सय्यद अकबर सय्यद छोटू अली, कांतिलाल भिकुलाल जयस्वाल, गणपत नारायण जुमडे, संभाजी हरी मोढे, राघू नामदेव पांढरे, कुंडलिक किशन बांगर, दिनकर माणिकराव काचगुंडे, बबन नामदेव गरपाल, अजीज रहीम बेग यांच्या विरूध्द महावितरणचे निरज रणवीर यांनी सेनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सदर वीज ग्राहकावर विज बिल थकीत प्रकरणी व वीज चोरी प्रकरणी वीजचोरी अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी अनधिकृत (Electricity Theft Case) वीज वापर मीटरची छेडछाड व महावीतरणची फसवणूक यामुळे अशा प्रकारच्या कारवाया होत आहे त्यामुळे वीज ग्राहकांनी वीजबील भरून वितरण कंपनीला सहकार्य करावे व कुठल्याही प्रकारचे वीज पुरवठा परस्पर जोडून घेऊ नये अन्यथा कार्यवाही होऊ शकते अशी माहिती अभियंता वीज वितरण कंपनी औंढां अभीयंता नीरज रणवीर यांनी दिली आहे.