रस्ता ओलांडताना बाप लेकास दुचाकीने उडवले, एकाचा मृत्यू
आखाडा बाळापूर (Bike Accidental Death) : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ते बोथी रस्त्यावर भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडणारे बाप लेकास धडक दिली यात वडिलांचा गंभीर जख्मी होऊन मृत्यू झाला तर मुलगा जख्मी झाला याबाबत आज सदर दुचाकी चालकाविरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार १० जुलै रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आखाडा बाळापूर ते बोथी रस्त्यावर आप्पा देववाडी येथे रामा अनंता वागतकर व त्यांचे वडील अनंता गंगाराम वागतकर(वय ६०वर्षे)हे दोघं रस्ता ओलांडत असताना दुचाकी एम एच २६ ए एक्स ७२५८च्या चालकाने त्याची दुचाकी भरधाव वेगाने हलगर्जीपणाने चालवून बापलेकास धडक दिली यात अनंता वागतकर हे गंभीर जख्मी होऊन त्यांचा मृत्यू झाला तर रामा वागतकर हे किरकोळ जख्मी झाले.याबाबत बुधवारी रामा वागतकर फिर्यादीवरून सदर दुचाकी चालकाविरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास बिट प्रमुख सिताराम मस्के हे करत आहेत.