DP area fire: शहरातील नारायण नगर भागातील मुख्य रस्

विज तारेच्या घर्षणामुळे पडलेल्या ठिणग्याने डीपी परिसरात लागली आग

DP area fire

नारायणनगर भागातील नागरिकांच्या पुढाकाराने आगीवर मिळविले नियंत्रण 

हिंगोली (DP area fire) : शहरातील नारायण नगर भागातील मुख्य रस्त्यावर असलेल्या डीपी जवळ २० मे बुधवार रोजी सायंकाळी विज पुरवठा करणाऱ्या विजतारा एकमेकांना घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्याने कचऱ्याने पेट घेतल्याने मोठी आग लागली यावेळी परिसरातील नागरिकांनी वेळीच लक्ष देऊन आगीवर पाणी ओतल्याने आग आटोक्यात आल्याने अनर्थ टळला आहे.

शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या नारायण नगर भागातील डॉक्टर लेन भागात डॉ. संजय नाकाडे यांच्या रुग्णालया जवळ असलेल्या डीपी जवळ काही ठिकाणी विज पुरवठा करणाऱ्या वीज तारा लोंबकळत आहेत. हवेने लोंबकळत असलेल्या विज तारा एकमेकांना घासुन झालेल्या घर्षणामुळे पडलेल्या ठिणग्याने डीपीच्या परिसरात असलेल्या कचऱ्याने पेट घेतला यामुळे या ठिकाणी मोठी प्रमाणावर आग लागली होती. 

या (DP area fire) भागात असलेल्या विविध व्यावसायिक व नागरिकांनी आगीवर पाणी ओतल्याने आग आटोक्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र काही वेळ या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता.  दरम्यान या डीपीच्या परिसरात लोंबकळत असलेल्या विज तारा सरळ कराव्यात अशी मागणी नागरिकातर्फे करण्यात आली आहे.