हिंगोली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 च्या च्या समादेशक पदी स्वाती भोर यांची नियुक्ती
हिंगोली (Commissioner Swati Bhor) : राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १२ च्या समादेशक पदी छत्रपती संभाजी नगर लोहमार्गच्या पोलिस अधिक्षक स्वाती रामराव भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगोली एसआरपीएफचे समादेशक पद मागील काही महिन्यापासून रिक्त होते. पौर्णिमा गायकवाड यांची यशदा पुणे येथे प्राध्यापक म्हणुन प्रतिनियुक्तीवर बदली झाल्यानंतर त्यांचा अतिरिक्त पदभार छत्रपती संभाजी नगर गट १४ चे विक्रम साळी यांच्याकडे 22 जानेवारी रोजी सोपविण्यात आला होता.
परंतु मध्यंतरी त्यांचाही हा पदभार जालना येथील समादेशक उज्वला वनकर यांच्याकडे मागील दिड महिन्यापूर्वी सोपविण्यात आला होता. १५ मे रोजी शासनाच्या गृहविभागाने अनेक उच्च पदस्थ अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. ज्यामध्ये (Commissioner Swati Bhor) हिंगोली राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१२ मध्ये स्वाती रामराव भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे आता राज्य राखीव पोलिस बलाला कायमस्वरूपी समादेशक मिळणार आहेत.