CNG Vehicles: एकीकडे केंद्र सरकारकडून सीएनजी आणि प

सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा; हिंगोलीत पंपांची संख्या अपुरी, चालकांची कोंडी

CNG Vehicles

हिंगोली (CNG Vehicles) : एकीकडे केंद्र सरकारकडून सीएनजी आणि पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे, तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यात मात्र सीएनजी पंपांच्या कमतरतेमुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतके सीएनजी पंप असल्याने दररोज सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत. तासन तास रांगेत उभे राहूनही अनेकदा ‘गॅस संपला’ असे उत्तर मिळत असल्याने चालकांना नाईलाजाने महागडे पेट्रोल-डिझेल भरावे लागत आहे.

हिंगोली शहर आणि परिसरात गेल्या दोन वर्षांत सीएनजी ऑटो, कार आणि स्कूल व्हॅनची संख्या झपाट्याने वाढली आहे. इंधन बचतीसोबतच प्रदूषण कमी होते म्हणून अनेकांनी सीएनजीचा पर्याय निवडला. मात्र, (CNG Vehicles) पंपांची संख्या त्या प्रमाणात वाढली नाही. परिणामी, सकाळपासूनच पंपांवर रिक्षा, कार आणि मालवाहू वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. भर रस्त्यावर वाहनांची रांग थेट मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचते, ज्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्नही निर्माण होत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात सध्या केवळ मोजक्याच ठिकाणी ठिकाणीच सीएनजी सुविधा उपलब्ध आहे.  मात्र, यातील सर्वच पंपांवर 24 तास सीएनजी उपलब्ध होत नाही. अनेकदा दाब कमी असल्याने किंवा पुरवठा खंडित झाल्याने पंप बंद ठेवावे लागतात, असे पंपचालक सांगतात. जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव या (CNG Vehicles) तालुक्यांमध्ये अद्याप एकही स्वतंत्र सीएनजी स्टेशन नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील चालकांना 30-40 किमी अंतर कापून हिंगोली किंवा कळमनुरी गाठावे लागते. सीएनजी वाहन घेतले पण आता पश्चात्ताप होतोय. दिवसातील 3-4 तास रांगेतच जातात. धंदा केव्हा करायचा?” असा सवाल रिक्षाचालक भागवत शिंदे यांनी उपस्थित केला. स्कूल व्हॅन चालकांचे म्हणणे आहे की, सीएनजी मिळाली नाही तर पेट्रोलवर गाडी चालवणे परवडत नाही आणि शाळेच्या फेऱ्या चुकतात. एकीकडे (CNG Vehicles) पेट्रोलियम मंत्रालय सीएनजी नेटवर्क वाढवण्यावर भर देत असले तरी हिंगोलीसारख्या जिल्ह्यांकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात नवीन सीएनजी स्टेशनसाठी महावितरण, गॅस वितरक कंपन्या आणि स्थानिक प्रशासनाने समन्वय साधून तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी वाहनधारक संघटनांनी केली आहे. अन्यथा ‘हरित इंधन’ योजना केवळ कागदावरच राहील, अशी भीती व्यक्त होत आहे. सध्या तरी हिंगोलीकरांना सीएनजीसाठी तासन तास रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.