Akhara Balapur Police Station: पोलिस करमचारींची वस

साडेतीन कोटी निधीतून उभारण्यात आलेल्या टोलेजंग नवीन इमारतीतून पोलिस स्थानकाचे कामकाज

Akhara Balapur Police Station

भूकंपाच्या धास्तीने जिर्ण झालेल्या इमारत ऐवजी नवीन इमारत सुरक्षित

आखाडा बाळापूर (Akhara Balapur Police Station) : हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पोलीस स्थानकापैकी एक आसलेल्या आखाडा बाळापूर पोलीस स्थानकाच्या पन्नाशी ओलांडून जुनी जिर्ण झालेल्या इमारत जागी  साडेतीन कोटी निधीतून भव्य टोलेजंग सर्व आवश्यक सोयीसुविधायुक्त इमारत साकारली गेली आहे.सदर इमारत काम सहा महिन्यांपुर्वीच पूर्ण झाले आहे. नवीन इमारत सज्ज असतानाही तक्रारी केल्याने हस्तांतरण प्रक्रिया अनेक दिवसांपासून रखडली होती. ८ जुलै रोजी झालेल्या भूकंपामुळे आधीच जिर्ण झालेल्या जुन्या इमारतीला तडे गेले भेगा पडल्या यामुळे भूकंपाच्या घटनेनंतर वरीष्ठांनी स्थलांतरासाठी तात्काळ आपत्कालीन परवानगी दिली परवानगी दिल्यानंतर गुरुवारपासून नवीन इमारतीतून पोलीस स्थानक कामकाज सुरु करण्याचे प्रयत्न दिसून  येत आहे.नवीन इमारत मध्ये वायरलेस यंत्रणा,सीसीटीएनएस यंत्रणा व इतर तांत्रिक कामे पूर्ण करण्याची प्रक्रिया शुक्रवारी सुरू होती शुक्रवारी पीएसओ कामकाज जुन्या इमारतीतच सुरू होते. परभणी जिल्हा असताना व नंतर हिंगोली जिल्हा झाल्यावर आखाडा बाळापूर पोलीस स्थानक सगळ्याच दृष्टीने महत्त्वाचे ठाणे समजल्या जाते येथे ठाणेदार म्हणून काम करण्यासाठी जुन्या काळापासून नेहमी 'स्पर्धा' राहत आली आहे. जुन्या काळी परभणी जिल्हा आसताना जुन्या गावात पोलीस स्थानक कार्यरत होते नंतर 1970ते 72 काळात नांदेड हिंगोली मुख्य रस्त्यावर स्वतः च्या विस्तीर्ण जागेत आखाडा बाळापूर पोलीस स्थानक इमारत व एक अधिकारी, पंधरा कर्मचारी पोलीस वसाहत बांधण्यात आली होती.पोलीस स्थानकाअंतर्गत डोंगरकडा, रामेश्वर तांडा पोलीस चौकी व वारंगाफाटा पोलीस मदतकेंद्र बरोबर आखाडा बाळापूर, बोल्डा, येहळेगाव तुकाराम साळवा हे बिट गाव वाडी तांडे मिळून 94 गावे आहेत.महामार्गा बरोबर इतर प्रमुख रस्त्यावर अपघात बरोबर इतर गुन्हे प्रमाण नेहमी जास्त आसते. जुनी पोलीस स्थानक इमारत पन्नास वर्षावरची झाली आसल्याने खराब झाली व अपुरी पडते पावसाळ्यात काही भागात पाणी येत होते. अनेकदा दुरूस्ती झाली आहे. सदर ठिकाणी नवीन पोलीस स्थानक इमारत व पोलीस कर्मचारी वसाहत प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.  नवीन इमारत साडेतीन कोटी निधीतून  पूर्ण झाली आहे.गुरूवारपासून नवीन इमारत कामकाज सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

नवीन इमारत 55बाय 90चौरस मिटर श्रेत्रात सदर इमारत उभारण्यात आली आहे.यात महिला व पुरुष बंदीगृह, कॉन्फरन्स हॉल,महिला विश्रामगृह,पुरुष विश्रामगृह,कोर्ट क्लार्क रूम, वायरलेस रूम, सीसीटिएनएस केबीन, प्रत्येक अधिकारी व विभागाचे वेगवेगळे कक्ष अशा स्वरुपात टोलेजंग इमारत उभी राहीली आहे.