Ashok Kamble Death: अनुराधा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्र

अनुराधा पतसंस्थेच्या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक कांबळे यांचा परभणी कारागृहात मृत्यू

Ashok Kamble Death)

हिंगोली (Ashok Kamble Death) : अनुराधा  अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. हिंगोली  या पतसंस्थेतील ६ कोटी २७ लाख  रुपयाच्या  अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक वामनराव कांबळे हे परभणी कारागृहात  न्यायालयीन कोठडीत होते. रविवारी दुपारच्या सुमारास कारागृहात त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त  झाली आहे. या बाबत अधिक माहिती अशी  की, हिंगोली शहरातील अनुराधा अर्बन को-ऑप क्रेडित सोसायटी लि. शाखेमध्ये अध्यक्ष  व संचालक मंडळाने २४ डिसेंबर २०१९ ते २४ फेब्रुवारी २०२४ या दरम्यानच्या कालावधीत ४०३८ ठेवीदारांनी गुंतवणुक केलेल्या  ६ कोटी २७ लाख ६५ हजार  १३० रुपयाच्या अपहार प्रकरणात लेखापरीक्षक अनिल पाराप्पा  बंधू यांनी हिंगोली  शहर  पोलिस ठाण्यात ३ मे २०२४ रोजी दिलेल्या  फिर्यादीवरून पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक वामनराव कांबळे  (५८) रा. गोपाल टॉकीज जवळ वाशिम यांच्यासह संचालक मंडळ  व कर्मचार्‍यावर फसवणुकीचा गुन्हा  दाखल करण्यात आला होता. या (Ashok Kamble Death) गुन्ह्याचा  तपास हिंगोलीच्या आर्थिक  गुन्हे  शाखेकडे  सोपविण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी पतसंस्थेचा  अध्यक्ष अशोक  कांबळे  यांना  जुलै २०२४ रोजी अटक  करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना  काही दिवस पोलिस  कोठडी सुनावली होती.

कालांतराने गुन्ह्याचा तपास झाल्यानंतर कांबळे  यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची परभणी कारागृहात रवानगी करण्यात आली होती. कांबळे  हे परभणी कारागृहात ९ ऑगस्ट २०२४ रोजी दाखल झाले  होते. ३ मे  रोजी अचानक त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना कारागृह प्रशासनाने तात्काळ  परभणीच्या शासकीय रुग्णालयात  उपचारासाठी हलविले. डॉक्टरांनी  त्यांना तपासल्यानंतर  दुपारी १.१८ वाजता मृत घोषीत केले. हा (Ashok Kamble Death) मृत्यू हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने झाला असल्याचे प्रशासनाने  सांगितले. या प्रकरणात पंचनामा  करण्याची प्रक्रिया कारागृहात प्रशासनाने सुरु  केली  होती. मयत अशोक कांबळे यांचे शवविच्छेदन ४ मे सोमवार रोजी होणार असून त्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात येणार  आहे.