JCB Battery Theft: खानापूर चित्त्यातील ज्ञानेश्वर

अज्ञाताने चोरली जेसीबी वाहनाची बॅटरी; खानापूर चित्ता येथील घटना

JCB Battery Theft

खानापूर चित्ता (JCB Battery Theft) : हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथील ज्ञानेश्वर परसराम जाधव यांच्या जेसीबी वाहनाची बॅटरी अज्ञाताने चोरून नेल्याने हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद  देण्यात आली आहे. खानापूर चित्ता येथील ज्ञानेश्वर जाधव यांच्या स्वतःच्या मालकीचा हिंगोली कळमनुरी राष्ट्रीय महामार्गालगत विकत घेतलेला प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये ते नेहमी आपले पोकलँड, जेसीबी, ट्रॅक्टर ही वाहने उभी करतात. 14 जुलै च्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे बाहेरून कामाहून आलेले जेसीबी वाहन उभे करून ते रात्री घराकडे गेले. 15 जुलै च्या रोजी सकाळी नेहमीप्रमाणे आपले जेसीबी वाहन क्रमांक एम एच 38 पी 0072 त्यांच्याजवळ आले असता, वाहनाजवळ जाळी पडल्याचे लक्षात येता. त्यांनी संपूर्ण वाहनाची पाहणी केल्यावर जेसीबी वाहनाचे ॲमरान कंपनीची काळी बॅटरी 1300,130, ए. एच नंबर 𝗔𝗗𝗖1417𝗬103207 चोरी गेल्याचे लक्षात येताच, आजूबाजूच्या नागरिकांना विचारपूस करून स्वतःचा पुतण्या शिवाजी जाधव यास विचारणा केली.

यावेळी नागरिकांनी व पुतण्यांनी आम्हाला काही माहीत नाही असे म्हणतात ज्ञानेश्वर जाधव यांच्या लक्षात आले की, आपल्या जेसीबी वाहनाची बॅटरी कोणीतरी अज्ञातांनी चोरून नेली. बॅटरीची (JCB Battery Theft) अंदाजी किंमत पाच ते सहा हजार रुपये असावे. यामुळे 15 ऑगस्ट रोजी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

 खानापूर चित्ता हे गाव राष्ट्रीय महामार्गा लगत असल्याने गावात अनेक फेरीवाले दिवसभर चालूच असतात. अनेक वाहने राष्ट्रीय महामार्गाच्या लगत जागेत उभी करण्यात येतात. या अगोदरही गावातील अनेक वाहन धारकाच्या वाहनाचे सामान चोरीला गेले आहे. परंतु थोड्या साठी कोणीही पोलीस ठाण्याकडे फिर्याद केली नाही. मात्र आज पाच ते सहा हजाराची मोठ्या वाहनाची बॅटरी अज्ञाताने चोरून (JCB Battery Theft) नेल्याने हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर जाधव यांना फिर्याद द्यावी लागली. कदाचित यापुढे अज्ञात चोरट्यांनी वाहनाचे कोणतेच सामान चोरून नेण्यास हिम्मत  करू नये.