निंबा गावात 21 वर्षीय पूनम सुनील चराटे हिने मामाच्
21 वर्षीय तरुणीने मामाच्या घरी गळफास लावून केली आत्महत्या
उरळ : मामाच्या घरी 21 वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज 31 मार्च रोजी निंबा गावात घडली. निंबा येथे राहत असलेल्या मामाकडे पाहुनी म्हणून आलेली पूनम सुनील चराटे (21) हिने राहत्या घरामध्ये दोरीने घराच्या नाटीला गळफास लावून आत्महत्या केली. तरुणीचे मामा दीपक अरुण तायडे राहणार निंबा यांनी याबाबतचे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई केली. याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष भोजने हे करीत आहेत.