श्री शिवाजी वस्तीगृहाच्या मैदानावर ४ ते ६ जून दरम

१३ व्या राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

13th Senior State-Level Dodgeball Championship

चिखली (13th Senior State-Level Dodgeball Championship) : श्री शिवाजी वस्तीगृहाच्या मैदानावर ४ ते ६ जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या वरिष्ठ राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी (६ जून) सकाळी ११ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी पद्माकर भुतेकर हे होते. यावेळी महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनचे महासचिव व शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. हनुमंत लुंगे यांच्यासह असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव (जळगाव), डॉ. हरीश काळे (अमरावती), दिनेश धारपवार (वाशीम), गिरीश काळे (अकोला), राम हराळे, पवार (पुणे), योगेश सोनवणे (जळगाव), सचिन कोकोडे, सचिन महाजन, गिरीश महाजन, देवानंद नेमाने, दिलीप लांडकर तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्पर्धेतील पुरुष गटात जळगाव संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर रायगड संघ उपविजेता ठरला. पिंपरी-चिंचवड आणि अहिल्यानगर संघांनी संयुक्तरीत्या तृतीय क्रमांक मिळविला.

महिला गटात पुणे संघाने विजेतेपदावर कब्जा केला. पिंपरी-चिंचवड संघाने द्वितीय स्थान मिळविले, तर ठाणे आणि बुलढाणा संघांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या व मानकरी संघांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री शिवाजी विद्यालयातील खो-खो खेळाडू तसेच श्री चंदनशेष क्रीडा मंडळ, सवणा येथील सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष वीर यांनी केले, तर आभार प्रदर्शन बुलढाणा जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव कैलास करवंदे यांनी केले.