Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आणखी > व्यापार

UPI Without Internet

इंटरनेटशिवाय UPI पेमेंटची सुविधा; PhonePe ने फीचर फोनसाठी आणले UPI 123Pay

डिजिटल पेमेंटचा वापर वाढत असताना इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सुविधा समोर आली आहे.


इंटरनेटशिवाय upi पेमेंटची सुविधा phonepe ने फीचर फोनसाठी आणले upi 123pay

UPI Without Internet |

निवडक HMD, Nokia, Lava आणि Itel फोनवर सुविधा; पैसे पाठवणे, बँक बॅलन्स तपासणे आणि व्यवहारांची माहिती पाहता येणार

डिजिटल पेमेंटचा वापर वाढत असताना इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सुविधा समोर आली आहे. PhonePe ने निवडक फीचर फोनसाठी UPI 123Pay सेवा सुरू केली असून, इंटरनेट कनेक्शन नसतानाही या माध्यमातून पैसे पाठवणे आणि पेमेंट करणे शक्य होणार आहे.

PhonePe च्या माहितीनुसार, UPI 123Pay ही सेवा एसएमएसवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करते. त्यामुळे स्मार्टफोन नसलेल्या तसेच इंटरनेटची सुविधा मर्यादित असलेल्या भागातील ग्राहकांनाही डिजिटल पेमेंट व्यवस्थेशी जोडण्यास मदत होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारतात २० कोटींपेक्षा अधिक फीचर फोन वापरकर्ते असून, त्यांना UPI सुविधेचा लाभ मिळावा या उद्देशाने ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

फीचर फोनवर कोणते व्यवहार करता येतील?

UPI 123Pay च्या माध्यमातून फीचर फोनवरून दुसऱ्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करता येतील. तसेच दुकानदाराला पेमेंट करणे, बँक खात्यातील शिल्लक तपासणे आणि यापूर्वी केलेल्या व्यवहारांची माहिती पाहणेही शक्य होईल. याशिवाय भविष्यात बिल पेमेंट, मोबाईल रिचार्ज आणि आधारच्या माध्यमातून UPI रजिस्ट्रेशन यांसारख्या सुविधा जोडण्याचा PhonePe चा मानस आहे.

या फोनमध्ये मिळणार सुविधा

सुरुवातीच्या टप्प्यात HMD १०५ 2G, HMD ११० 2G, Nokia १०५ Classic, Nokia १०५ Single SIM, Nokia १०५ Dual SIM, Nokia १०६ आणि Nokia १२३ Shield या निवडक मॉडेल्समध्ये UPI 123Pay उपलब्ध आहे. HMD, Nokia, Lava International आणि Itel Mobile यांच्या काही फीचर फोन मॉडेल्सनाही या सेवेचा सपोर्ट देण्यात आला आहे.

UPI 123Pay रजिस्ट्रेशन कसे करायचे?

UPI 123Pay वापरण्यासाठी सर्वप्रथम सपोर्ट असलेल्या फीचर फोनमध्ये PhonePe अॅप सुरू करून नियम व अटी स्वीकाराव्या लागतील. त्यानंतर संबंधित बँक निवडावी लागेल. पुढील प्रक्रियेत डेबिट कार्डचे शेवटचे सहा अंक आणि कार्डची एक्सपायरी डेट टाकावी लागते. त्यानंतर UPI PIN सेट केल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

रजिस्ट्रेशन झाल्यावर मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट किंवा UPI IDच्या माध्यमातून पैसे पाठवता येतील. कॅमेरा उपलब्ध असलेल्या फीचर फोनमध्ये QR कोड स्कॅन करून पेमेंट करण्याची सुविधाही मिळू शकते.

१३ भारतीय भाषांमध्ये AI व्हॉइस हेल्पलाइन

PhonePe कडून UPI 123Pay वापरणाऱ्या ग्राहकांसाठी AI आधारित व्हॉइस हेल्पलाइनची सुविधाही देण्यात आली आहे. इंग्रजीसह १३ भारतीय भाषांमध्ये ग्राहकांना व्यवहाराची प्रक्रिया समजून घेण्यासाठी टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन मिळणार आहे.

इंटरनेटशिवाय व्यवहार करता येत असल्यामुळे कमकुवत नेटवर्क किंवा मर्यादित 2G कनेक्टिव्हिटी असलेल्या भागातील ग्राहकांसाठी UPI 123Pay उपयुक्त ठरू शकते.

Related to this topic: