नवीन स्मार्टफोन खरेदी करताना केवळ दुकानात किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दिसणारी किंमत पाहून निर्णय घेणे महागात पडू शकते.
Price Tracker पासून Bank Offers, Exchange Bonus आणि Hidden Coupons पर्यंत; स्मार्टफोन खरेदी करताना खर्च कमी करण्याचे सोपे मार्ग
नवीन स्मार्टफोन खरेदी करताना केवळ दुकानात किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दिसणारी किंमत पाहून निर्णय घेणे महागात पडू शकते. Amazon, Flipkart तसेच विविध मोबाईल ब्रँड्सकडून ग्राहकांना Bank Offers, Exchange Bonus, Coupons आणि इतर सवलती दिल्या जातात. त्यामुळे फोन खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी तपासल्यास त्याच मॉडेलवर हजारो रुपयांची बचत होऊ शकते. स्मार्टफोन खरेदी करताना फायदेशीर डील मिळवण्यासाठी कोणत्या पाच गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घेऊया.
1. मोबाईलची जुनी किंमत आधी तपासा
ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर स्मार्टफोनच्या किमती वारंवार बदलत असतात. काही वेळा सेलपूर्वी किंमत वाढवून त्यावर मोठी सूट दाखवली जाऊ शकते. त्यामुळे प्रत्यक्षात मिळणारी ऑफर किती फायदेशीर आहे, हे तपासणे महत्त्वाचे आहे.
यासाठी 'PriceBefore' किंवा 'Keepa' यांसारख्या Price Tracker टूल्सचा वापर करता येतो. संबंधित फोनची लिंक टाकल्यानंतर मागील सहा महिन्यांतील त्याची किमान आणि कमाल किंमत पाहता येते. त्यामुळे सध्याची किंमत खरोखरच कमी आहे का, याचा अंदाज घेणे सोपे जाते.
2. Bank आणि Credit Card Offersकडे दुर्लक्ष करू नका
स्मार्टफोनवर थेट डिस्काउंट देण्याऐवजी अनेक कंपन्या बँकांसोबत भागीदारी करून ग्राहकांना विशेष ऑफर्स देतात. त्यामुळे खरेदीच्या वेळी 'Bank Offers' हा विभाग तपासणे फायदेशीर ठरते.
SBI, HDFC, ICICI किंवा Axis बँकेच्या काही Credit आणि Debit Cardsवर 5 ते 10 टक्क्यांपर्यंत Instant Discount मिळू शकतो. उपलब्ध ऑफरनुसार अशा सवलतीतून 1,500 ते 5,000 रुपयांपर्यंत बचत होण्याची शक्यता असते.
3. जुना फोन Exchange करून अतिरिक्त फायदा मिळवा
नवीन मोबाईल घेताना घरात असलेला जुना स्मार्टफोन Exchange करता येतो. अनेक कंपन्या नवीन मॉडेल्सवर Additional Exchange Bonus देतात. जुन्या फोनच्या Exchange Value व्यतिरिक्त 2,000 ते 3,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते.
मात्र Exchange करण्यापूर्वी जुन्या फोनची बाजारातील किंमत तपासणेही महत्त्वाचे आहे. 'Cashify' सारख्या ॲपवर फोनची किंमत पाहून अधिक चांगली ऑफर कुठे मिळते, याची तुलना करता येते.
4. अधिकृत वेबसाइटवरील ऑफरही तपासा
स्मार्टफोन खरेदीसाठी फक्त Amazon किंवा Flipkartवर अवलंबून राहण्याची गरज नाही. संबंधित ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवरही त्याच फोनवर वेगवेगळ्या सवलती उपलब्ध असू शकतात.
Samsung.com, Realme.com, Mi.com आणि Apple.com यांसारख्या अधिकृत वेबसाइट्सवर नवीन ग्राहकांसाठी Welcome Coupons दिले जाऊ शकतात. काही ब्रँड्स विद्यार्थ्यांसाठी Student Discountची सुविधाही देतात. कॉलेजचे ओळखपत्र अपलोड केल्यानंतर काही ऑफर्समध्ये अतिरिक्त 5 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.
5. Payment Pageवरील Coupons आणि No-Cost EMI तपासा
ऑर्डर अंतिम करण्यापूर्वी Payment Pageवर उपलब्ध असलेले सर्व Coupons तपासणे आवश्यक आहे. काही वेळा 500 ते 1,000 रुपयांपर्यंतचे कूपन उपलब्ध असते; मात्र ते ग्राहकाला स्वतः Apply करावे लागते.
बजेट मर्यादित असल्यास No-Cost EMI हा पर्यायही निवडता येतो. या सुविधेमुळे फोनची रक्कम मासिक हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा मिळते. काही बँकांकडून No-Cost EMIसोबत Instant Discountही दिला जातो. मात्र EMI निवडण्यापूर्वी संबंधित ऑफरच्या अटी आणि शुल्कांची माहिती तपासणे महत्त्वाचे आहे.