श्री अंबाबाई मंदिर दान

अंबाबाई चरणी दानाचा महापूर; मंदिराला तब्बल 1 कोटींचे महसूल

Shri Ambabai Temple Donation: महाप्रसादातील लाडूंना भाविकांकडून मोठी मागणी असते. यंदाच्या नवरात्रोत्सवातही लाडूविक्रीने विक्रमी आकडा गाठला. अवघ्या 10 दिवसांत तब्बल 1 लाख 37 हजार 689 लाडूंची विक्री...

अंबाबाई चरणी दानाचा महापूर; मंदिराला तब्बल 1 कोटींचे महसूल

Shri Ambabai Temple Donation

 

सोन्या-चांदीच्या दानासह लाडूविक्रीतूनही विक्रमी कमाई

कोल्हापूर (Shri Ambabai Temple Donation) : साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख शक्तिपीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांनी दानाचा भरभरून वर्षाव केला. 10 दिवसांच्या उत्सवकाळात रोख व ऑनलाइन देणग्या, प्रसाद आणि विविध वस्तूंच्या विक्रीतून देवस्थान समितीला तब्बल 1 कोटी 30 लाख 56 हजार 154 रुपयांचा महसूल मिळाला आहे. याशिवाय 20 लाख रुपयांहून अधिक किमतीचे सोने आणि 44 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची चांदी देवीच्या चरणी अर्पण करण्यात आली. त्यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव धार्मिक उत्साहासोबतच आर्थिकदृष्ट्याही विशेष ठरला आहे.

11 ते 20 ऑक्टोबरदरम्यान झालेल्या या उत्सवात देश-विदेशातून आलेल्या भाविकांनी अंबाबाईला सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम (Shri Ambabai Temple Donation) आणि ऑनलाइन माध्यमातून देणगी अर्पण केली. या कालावधीत 20 लाख 30 हजार 223 रुपये किमतीचे 130 ग्रॅम 305 मिली सोने, तर 44 लाख 38 हजार 467 रुपये किमतीची 16 किलो 283 ग्रॅम 620 मिली चांदी देवीच्या चरणी अर्पण करण्यात आली. याशिवाय रोख रक्कम आणि ऑनलाइन क्यूआर कोडद्वारे 36 लाख 75 हजार 594 रुपयांच्या देणग्या देवस्थान समितीकडे जमा झाल्या.

लाडूविक्रीतून 20 लाखांहून अधिक उत्पन्न

अंबाबाईच्या (Shri Ambabai Temple Donation) महाप्रसादातील लाडूंना भाविकांकडून मोठी मागणी असते. यंदाच्या नवरात्रोत्सवातही लाडूविक्रीने विक्रमी आकडा गाठला. अवघ्या 10 दिवसांत तब्बल 1 लाख 37 हजार 689 लाडूंची विक्री झाली. त्यातून देवस्थान समितीला 20 लाख 65 हजार 335 रुपयांचे उत्पन्न मिळाले. लाडूविक्रीसोबतच अगरबत्ती आणि कॅलेंडरच्या विक्रीतूनही चांगला महसूल जमा झाला. अगरबत्ती विक्रीतून 4 लाख 43 हजार 200 रुपये, तर 2 हजार 213 कॅलेंडरच्या विक्रीतून 1 लाख 32 हजार 795 रुपये मिळाले. तसेच भाविकांनी अर्पण केलेल्या साड्यांच्या लिलाव व विक्रीतून 2 लाख 70 हजार 540 रुपयांचा महसूल देवस्थान समितीला प्राप्त झाला.

सोन्या-चांदीच्या दानासह वस्तूंच्या विक्रीतही भर

नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या मौल्यवान धातूंच्या दानाबरोबरच विविध वस्तूंच्या विक्रीतूनही मंदिराच्या उत्पन्नात भर पडली. रोख व ऑनलाइन देणग्या, महाप्रसाद लाडू, अगरबत्ती, कॅलेंडर आणि साड्यांच्या विक्रीतून मिळालेल्या महसुलामुळे यंदाचा उत्सव देवस्थान समितीसाठी महत्त्वपूर्ण ठरला. (Shri Ambabai Temple Donation) अंबाबाईच्या दर्शनासाठी झालेली भाविकांची गर्दी, महाप्रसादाला मिळालेला प्रतिसाद आणि दानाच्या माध्यमातून व्यक्त झालेली श्रद्धा यामुळे कोल्हापूरच्या या प्रसिद्ध शक्तिपीठात नवरात्रोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला.

संबंधित सामग्री

यवतमाळमध्ये भूकंपाचे धक्के! एकलासपूरमध्ये ३ रिश्टर स्केलची नोंद; नागरिकांमध्ये भीती

यवतमाळमध्ये भूकंपाचे धक्के! एकलासपूरमध्ये ३ रिश्टर स्केलची नोंद; नागरिकांमध्ये भीती

यवतमाळच्या एकलासपूरमध्ये ३ रिश्टर स्केलचा भूकंप! नागरिकांमध्ये भीती, सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी नाही.

Nov 09, 2026
दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरमध्ये आगीच्या आठ घटना; ३० जवानांकडून युद्धपातळीवर बचावकार्य

दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरमध्ये आगीच्या आठ घटना; ३० जवानांकडून युद्धपातळीवर बचावकार्य

लातूरमध्ये दिवाळीच्या फटाक्यांमुळे आठ ठिकाणी आग; ३० जवान आणि आठ अग्निशमन वाहनांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

Nov 09, 2026
मानोऱ्यात मनोज जरांगे पाटलांचे जंगी स्वागत; समाजबांधव आणि शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती

मानोऱ्यात मनोज जरांगे पाटलांचे जंगी स्वागत; समाजबांधव आणि शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती

मनोज जरांगे पाटील यांचे मानोरा शहरात आगमन होताच समाजबांधव आणि शेतकऱ्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

Nov 09, 2026
ठाणे जिल्ह्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी! ९ नोव्हेंबरपासून नवे निर्बंध; ८ जानेवारी २०२७ पर्यंत आदेश लागू

ठाणे जिल्ह्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी! ९ नोव्हेंबरपासून नवे निर्बंध; ८ जानेवारी २०२७ पर्यंत आदेश लागू

दिवाळीतील आगीच्या घटनांनंतर ठाणे जिल्ह्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी लागू. ९ नोव्हेंबर २०२६ ते ८ जानेवारी २०२७ पर्यंत निर्बंध कायम राहणार.

Nov 09, 2026
धनतेरसच्या दिवशी कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; चार डबे जळून खाक

धनतेरसच्या दिवशी कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; चार डबे जळून खाक

Punjab Karmabhoomi Express Fire: धनतेरसच्या दिवशी पंजाबमध्ये अमृतसरहून न्यू जलपाईगुडीकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडली. सराय बंजारा रेल्वे स्थानक घटना.

Nov 06, 2026