Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आणखी > अध्यात्म

श्रीक्षेत्र रामटेक पायदळ वारी

नागपुर ते श्रीक्षेत्र रामटेक पायदळ वारीचे कांद्री-कन्हानला स्वागत

Srikshetra Ramtek Wari: नागपुर ते श्रीक्षेत्र रामटेक पायदळ वारीचे कांद्री-कन्हान शहरात भव्य स्वागत केले गेले. या वारीमध्ये संताजी सभागृहात कीर्तन आणि भोजनाचे आयोजन करण्यात आले.


नागपुर ते श्रीक्षेत्र रामटेक पायदळ वारीचे कांद्री-कन्हानला स्वागत

Srikshetra Ramtek Wari |

कन्हान (Srikshetra Ramtek Wari) : सर्वश्री वारकरी सांप्रदाय दिंडी सोहळा नागपुर व्दारे श्री संत ज्ञानेश्वर मंदिर जूनी मंगळवारी, नागपुर ते श्री क्षेत्र रामटेक पायदळ वारी चे कन्हान शहरात आगमण होताच भव्य स्वागत करून संताजी सभागृह कांद्री-कन्हान येथे किर्तन, भोजन करून रात्री मुक्काम करून सकाळी पायदळ वारी रामटेक कडे प्रस्थान करण्यात आले. 

मंगळवार (दि.२४) मार्च ला सायंकाळी सर्वश्री वारकरी सांप्रदाय दिंडी सोहळा (Srikshetra Ramtek Wari) नागपुर व्दारे २३ व्या वर्षी श्री संत ज्ञानेश्वर मंदिर जूनी मंगळवारी, नागपुर ते श्री क्षेत्र रामटेक (दि.२३ ते २७ मार्च) पायदळ वारीचे कन्हान शहरात सायंकाळी आगमण होताच कन्हान-कांद्री शहरात जल्लो षात भव्य स्वागत करून सायं. ७ वाजता श्री संताजी सभागृह कांद्री-कन्हान येथे जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई चा जल्लोष होऊन ह.भ.प. लोडेकर महाराज कन्हान यांचे किर्तन करून पायदळ वारी प्रमुख ह.भ.प. सुरेंद्र बुवा निंबुळकर, पांडुरंग पंत तांबुसकर, प्रमोद हिवरे, भारत ठाकरे, रवि गावंडे, लताबाई गावंडे, सुवर्णाताई वानखेडे यांचे स्वागत तेली समाज कन्हान कांद्री संस्थेच्या वतीने करण्यात आले. तदंतर प्रसाद वाटप आणि सर्व भावि कांचे भोजन करून रात्री मुक्काम करण्यात आला. बुधवार (दि.२५) मार्च ला पहाटे सकाळी पुजा अर्चना करून सर्वश्री वारकरी सांप्रदाय दिंडी सोहळा नागपुर व्दारे संताजी सभागृह आणि तेली समाज कन्हान - कांद्री च्या पदाधिका-यांना नारळ पान देऊन आभार व्यक्त करण्यात आले.

नंतर पायदळ वारीचे रामटेककडे (Srikshetra Ramtek Wari) प्रस्थान करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता श्री संताजी स्मृती सभागृह कन्हान-कांद्री अध्य क्ष मा. शरद डोणेकर, उपाध्यक्ष माधवराव मरघडे, वसंतराव कांबळे, संपर्क प्रमुख वामनराव देशमुख, सचिव अशोक हिंगणकर, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम बेले व कार्यकारी मंडळ मनोहर कोल्हे, महादेव किरपान, लक्ष्मीकांत गिरडकर, शिवाजी चकोले, चंद्रशेखर बाव नकुळे, अल्का कोल्हे, मंगला हटवार, अपूर्वा हिंगणक र, जयश्री मरघडे, कल्पना देशमुख, गीता सरोदे आदी सह सदस्यानी सहकार्य केले.

Related to this topic: