Ashadhi Ekadashi : पी. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाचा जयघोष
अमरावती (Ashadhi Ekadashi ) : पी. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाचा जयघोष करत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संपूर्ण शाळा परिसर "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "विठ्ठल विठ्ठल" या नामघोषाने दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वारकरी तसेच विठ्ठल-रुक्मिणी यांच्या वेशभूषेत आकर्षक सादरीकरण केले. अभंग, भजन आणि वारकरी परंपरेवरील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगण्यात आले.

या (Ashadhi Ekadashi) प्रसंगी शाळेचे प्राचार्य सचिन दुर्गे सर यांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायातील समता, सेवा, भक्ती आणि संस्कार यांचे महत्त्व पटवून दिले. उपप्राचार्या सोनल निस्ताने मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत भारतीय संस्कृती आणि परंपरा जपणारे असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले.